पुणे प्रतिनिधी:
हडपसर येथे एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. आईने
आपल्या पोटच्या चार वर्षीय मुलीची चाकू भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली
आहे.
ही घटना काल सोमवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या
सुमारास हडपसर येथील सिद्धिविनायक दुर्गाकूर सोसायटी ससाणे नगर येथे पडली आहे.
घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी आईला अटक केली आहे. दरम्यान, आरोपी आईने ही हत्या कोणत्या कारणातून
केली हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. वैष्णवी महेश वाडेर (वय. ४ वर्ष) असं हत्या
झालेल्या मृत मुलीचे नाव आहे.
आरोपी महिला ही तिच्या मुलीसोबत एकटीच राहत होती. महिन्यापूर्वी ती तेथे राहण्यास आली होती. बेकरी प्रॉडक्ट विक्रीचा व्यवसाय आरोपी महिला करत होती. सोमवारी आरोपी महिला भाड्याचे घर खाली करणार होती त्यामुळे त्याठिकाणी घरमालक चौकशीसाठी गेले होते. मात्र सदर महिलेने आतमधून दरवाजा बंद केला होता. दरम्यान शेजारच्या असणाऱ्या नागरिकांनी महिलेला दरवाजा उघडण्यास सांगितले. मात्र तिने दरवाजा उघडला नाही शेवटी घरमालकाने आणि शेजारील सर्वांनी दरवाजा उघडून आत जाऊन पाहिले असता मुलीचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलीची हत्या करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.त्यांनी मृत मुलीच्या आईकडे चौकशी केली असता तिनेच हा खून केल्याची कबुली दिली. तिच्या कबुलीवरून हडपसर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.