समर्थ भारत वृत्तसेवा
घोडेगाव, ता. ३०: घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील व्यावसायिक सुनील झोडगे यांना जागेच्या वादातून इंदुबाई गुंजाळ आणि इतर २५ ते ३० जणांच्या टोळक्याने बेकायदा जमाव जमवून बेदम मारहाण केली आहे.
घोडेगाव येथील वडारआळी परिसरातील गट क्र. ३५१/१ मध्ये इंदुबाई गुंजाळ आणि इतर काही व्यक्ती सिमेंटचे खांब रोवत असताना सुनील झोडगे त्यांना विचारणा करायला गेले असता, इंदुबाई गुंजाळ यांनी सुनील झोडगे यांना सदर जागा स्वतःची असल्याचे सांगत शिवीगाळ आणि दमदाटी करत त्यांच्यासोबत असणाऱ्या टोळक्याच्या सहाय्याने मारहाण करून जखमी केले.
याबाबत सुनील सुर्यकांत झोडगे यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपी इंदुबाई गुंजाळ आणि इतर २५ ते ३० अज्ञात इसमांवर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वायाळ हे पुढील तपास करत आहेत.