समर्थ भारत वृत्तसेवा
आळेफाटा, ता. ३०: आळेफाटा (ता. जुन्नर) येथे एस. टी. स्टॅडवर दिनांक १ नोव्हेंबर २०२२ रोजी छाया हरिश्चंद्र थोरात रा. कळंब ता. आंबेगाव जि. पुणे या बसमध्ये चढत असताना तेथे चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेवुन त्यांचे पर्समध्ये ठेवलेले एकुण १००० हजार रूपये व ३ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र असा एकुण १,५८,५००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेले बाबत आळेफाटा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून इतर गुन्ह्यांची देखील उकल घडवून आणण्यात आळेफाटा पोलिसांना यश आले आहे.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान गोपनिय बातमी
दारामार्फत माहिती मिळवून आरोपींचे मोबाईल नंबर प्राप्त करून मोबाईल नंबरचे
तांत्रिक विश्लेषण करून सदरचे आरोपी हे बिडकीन ता. पैठण जि. संभाजीनगर येथिल
असल्याचे निष्पन्न झाल्याने; तात्काळ
सदर ठिकाणी पोलीस पथक रवाना झाले. या गुन्हयातील आरोपी बबन आनंदा भोसले (वय २७
वर्षे)
रा. बाजारतळ बिडकीन ता.पैठण जि. औरंगाबाद यास सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.
चोरीचे सोने वितळवून लगड बनवली
बबन भोसलेकडे गुन्हयाच्या अनुषंगाने तपास केला असता; त्याने त्याची सारोळा कासार (ता. जि. अहमदनगर) येथील
महिला साथीदाराच्या मदतीने हे गुन्हे केले असल्याचे सांगितल्याने तात्काळ अहमदनगर
येथे टिम रवाना झाली आणि सदर महिला आरोपीस ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आरोपी
बबन आनंदा भोसले याच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने तपास करता त्याने सदरचे
चोरलेल्या सोन्याचे दागिने वितळून त्याची लगड बनवून त्याचे राहत्या घरात लपवून ठेवली
असल्याची कबुली दिल्याने आरोपीसह पोलीस पथक सदर ठिकाणी पंचासमक्ष जावून त्याच्या
राहत्या घरातून एकुण १७ तोळे वजनाची आणि ८,५०,०००/- रुपये किंमतीची लगड जप्त करण्यात आली आहे.
बंटीला बबलीची सात गुन्ह्यांत साथ
या दोघांनी यापूर्वी सुध्दा आळेफाटा परीसरात त्यांनी गुन्हे केल्याची कबुली दिली असुन त्यांनी आळेफाटा परीसरात एकुण ७ गुन्हे केल्याचे निष्पण्ण झाले असुन त्यांनी गुन्ह्यात चोरी केलेले एकुण १७ तोळे सोने हे गुन्ह्याचे कामी हस्तगत करून जप्त करण्यात आलेले आहे. अटक आरोपीकडुन आळेफाटा पोलिस स्टेशन हद्दीतील सात गुन्हे उघडकीस आलेले आहेत. सदरचे आरोपींकडुन एकुण ८,५०,००० /- रुपये किंमतीचे १७ तोळे सोन्याची लगड असा मुद्देमाल तपासाकामी जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर, पो. हवा, नरेंद्र गायकवाड, पो. हवा. विनोद गायकवाड, पो.ना पंकज पारखे, पो.कॉ आमित मालुंजे, पो.कॉ नविन अरगडे, पो.कॉ. हनुमंत ढोबळे, पो.कॉ प्रशांत तांगडकर, म.पो.कॉ. दिपाली फंटागरे यांनी केली आहे.