अकोले प्रतिनिधी :
अकोले तालुक्यातील उंचखडक बुद्रुक आणि पंचक्रोशीत गेल्या काही दिवसांपासून हिंस्त्र बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे.या बिबट्यांनी अनेक शेतकऱ्यांवर रात्री अपरात्री शेतीला पाणी देण्यासाठी गेले असता जिवघेणे हमले केले होते. तसेच अनेक पाळीव प्राणी देखील यांनी फस्त केली आहे तरी या बिबट्यांची या परिसरात राजरोसपणे वावर असल्यामुळे लहान मुले देखील भयभीत झाली आहे. याची दखल घेत अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक तथा अगस्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अशोक देशमुख व उंचखडक बुद्रुक गावचे कार्यक्षम उपसरपंच महिपाल देशमुख यांनी गेल्या आठ दिवसांपूर्वीच स्वखर्चाने वनविभागाचा पिंजरा अशोकराव देशमुख यांच्या वस्तीनजीक आणून लावला होता. आज रात्री १:३० वाजता एक बिबट्या या सापळ्यात अडकला तरी आणखी दोन बिबटे हे मोकाटच असल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
याप्रसंगी अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक तथा अगस्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अशोक देशमुख व उंचखडक बुद्रुक गावचे कार्यक्षम उपसरपंच महिपाल देशमुख यांनी विद्युत वितरण कंपनीकडे शेतीसाठी पुर्ण क्षमतेने दिवसा विद्युतपुरवठा करण्याची मागणी केली आहे. तसेच वनविभागाने गावकऱ्यांच्या मागणीनुसार ज्या ठिकाणी बिबट्यांचा वावर असतो त्याच ठिकाणी वनभिगाच्या खर्चाने पिंजरा लावावा जेणेकरून या प्रसंगातून शेतकऱ्यांना दिलासा मिळु शकेल. या ठिकाणी बिबट्या पाहण्यासाठी लहान मोठ्यांनी मोठी गर्दी केली होती तरी वनरक्षक सागर त्र्यंबकराव देशमुख व काकड यांनी या बिबट्याचा ताबा घेतला. प्रसंगी किशोरनाना मंडलिक, विलास हासे, सुनिलबापु देशमुख, तात्यासाहेब देशमुख, सचिन देशमुख, भाऊसाहेब खरात, भास्कर वाळुंज, जितेंद्र कसबे, दत्तात्रय वाळुंज, आत्माराम वाळुंज आदी ग्रामस्थ उपस्थित होते.