समर्थ भारत वृत्तसेवा
घोडेगाव, ता. ३०: एका २९ वर्षीय महिलेला जबरदस्तीने शरीरसंबंधास भाग पाडून आणि त्याचे व्हिडीओ चित्रीकरण करून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी दीपक बबनराव कदम [रा. आंबेगाव गावठाण (घोडेगाव), ता. आंबेगाव, जि. पुणे] याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१८ मार्च २०२० रोजी आणि मार्च २०२० मध्ये एके दिवशी दीपक कदमने पिडीत महिलेला तिच्या राहत्या घरात जबरदस्ती करून शरीर संबंधास भाग पाडले. पिडीत महिलेने विरोध केला असता, आरोपी कदम याने पिडीत महिलेस शिवीगाळ आणि मारहाण देखील केली. दरम्यान आरोपी कदम याने. त्या घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण केले. त्यानंतर आरोपी दीपक कदम याने पिडीत महिलेस सदर घटनेची वाच्यता केल्यास आपण ते व्हिडीओ चित्रीकरण पिडीत महिलेच्या नातेवाईक आणि दाखवू तसेच ते व्हायरल करू अशी धमकी दिली.
याबाबत पिडीत महिलेने धाडस करुन सदर हकीकत पोलिसांना सांगितल्याने आरोपी दीपक बबनराव कदम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मगदूम पुढील तपास करत आहेत.