प्रतिनिधी: मिथुन मोजाड
राष्ट्रीय स्थायी विकास संस्था (NISD) ही सेवाभावी संस्था असून जुन्नर
तालुक्यातील आदिवासी व ग्रामीण विभागामध्ये मेट्रोपोलीस प्रकल्प अंतर्गत किशोरवयीन
मुलीसोबत' किशोरी प्रकल्प राबवत आहे असे विजयकुमार
शिंदे यांनी सांगितले व हा प्रकल्प संस्था अध्यक्ष डॉ. प्रकाश पाळंदे यांच्या
मार्गदर्शनानुसार २० गावांमध्ये व वाड्या वस्तीवर प्रकल्प सुरू आहे.
या
प्रकल्प अंतर्गत मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी नेतृत्वगुण विकास कौशल्य
कार्यक्रम, गर्ल क्लब, महिला बचत गट , शालेय
व आरोग्य विषयक प्रशिक्षणे,
मुलींना सॅनिटरी पॅड व डिस्पोजल मशीन
वाटप, स्टेशनरी, परसबाग विषयी प्रशिक्षण व वाटप
इत्यादी सारखे अनेक समाजशील उपक्रम राबवित आहे.
त्याचाच एक भाग म्हणून १५ ते २० गावांमध्ये
मुलींची सुरक्षा राष्ट्रीय स्थायी विकास संस्थे अंतर्गत स्थापन केले आहे. या मीटिंगमध्ये
मुलींच्या सुरक्षेचा आढावा वेळोवेळी घेतला जात असून त्यांच्या समस्या व समस्यांचे निराकरण
करण्यासाठी संस्था सतत प्रयत्नशील असते. यामध्ये मुलींच्या शालेय व आरोग्य समस्या
तसेच बालविवाह व मुलींचे हक्क याबाबत सतत मुलींना
मार्गदर्शन मिळत आहे.
यावेळी सितेवाडी गावचे लोक नियुक्त सरपंच दिपाली
पाटेकर, पुणे वैभव चे पत्रकार मिथुन मोजाड, पोलीस पाटील विक्रम मोजाड, श्याम जगताप शालेय समिती अध्यक्ष, अंगणवाडी सेविका यावेळी उपस्थित
होत्या.
सर्व ग्रामस्थांकडून या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.