Skip to main content

Posts

Showing posts from March, 2023

दारू पिऊन शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये गोंधळ घालत फोडली कपाटाची काच.

समर्थ भारत वृत्तसेवा शिक्रापूर , ता. ३०:     शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन मध्ये दारु पिऊन आरडाओरडा करत गोंधळ घालून पोलिसांच्या अंगावर धावून जात कपाटाची काच फोडल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे केंदूरच्या ऐन यात्रेवेळी माजी उपसरपंच राजेंद्र हिरालाल ताठे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. वाजेवाडी (ता. शिरुर) येथील चौफुला येथे काही इसम दारु पिऊन गोंधळ घालत असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली असता पोलीस नाईक हेमंत कुंजीर व संतोष शिंदे यांनी सदर ठिकाणी जात पाहणी केली असता तीन इसम गोंधळ घालताना दिसून आले. दरम्यान केंदूरचे माजी उपसरपंच असलेले राजेंद्र ताठे हे पोलिसांच्या अंगावर धावून येत दमदाटी करु लागले , दरम्यान पोलिसांनी त्यांना पोलीस   स्टेशन येथे आणले असता ताठे हे पोलीस स्टेशन मध्ये आरडाओरडा करत गोंधळ घालू लागले. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे , पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ शिंदे , पोलीस नाईक हेमंत कुंजीर , संतोष शिंदे , पोलीस शिपाई...

पोलिस चौकशी दरम्यान अट्टल गुन्हेगाराकडुन तीन गुन्ह्यांची उकल.

समर्थ भारत वृत्तसेवा रांजणगाव गणपती , ता. ३०:   रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोनेसांगवी येथील एका किराणा दुकानात सुमारे 65 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन फरार झालेल्या विजय लक्ष्मण गलांडे (वय 31) रा.सासवडरोड , गोंधळेनगर , हडपसर , पुणे सध्या रा. पेरणेफाटा , ता. हवेली , जि. पुणे या आरोपीला पोलिसांनी अटक करुन त्याच्याकडुन चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला होता. तपासा दरम्यान त्याने वेगवेगळ्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत अजुन तीन गुन्हे केल्याची कबुली दिली असल्याचे तपास अधिकारी सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले.   रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनेसांगवी (ता. शिरुर) येथे रविंद्र गंगाराम डांगे यांचे जय मल्हार ट्रेडर्स नावाच्या किरणा दुकान असुन (दि. 19) मार्च रोजी रात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने शटर उचकटुन दुकानातील 65 हजार 500 रुपये किंमतीचा किराणा माल चोरुन नेला होता. याबाबत रविंद्र डांगे यांच्या फिर्यादीवरुन (दि 20) मार्च रोजी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुध्द घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.   या गुन्हयाचा तपास ...

आळेफाटा परिसरात एस. टी. स्टँडवर चोरी करणारी टोळी जेरबंद.

समर्थ भारत वृत्तसेवा आळेफाटा , ता. ३०:   आळेफाटा (ता. जुन्नर) येथे एस. टी. स्टॅडवर दिनांक १ नोव्हेंबर २०२२ रोजी छाया हरिश्चंद्र थोरात रा. कळंब ता. आंबेगाव जि. पुणे या बसमध्ये चढत असताना तेथे चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेवुन त्यांचे पर्समध्ये ठेवलेले एकुण १००० हजार रूपये व ३ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र असा एकुण १ , ५८ , ५००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेले बाबत आळेफाटा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून इतर गुन्ह्यांची देखील उकल घडवून आणण्यात आळेफाटा पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान गोपनिय बातमी दारामार्फत माहिती मिळवून आरोपींचे मोबाईल नंबर प्राप्त करून मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण करून सदरचे आरोपी हे बिडकीन ता. पैठण जि. संभाजीनगर येथिल असल्याचे निष्पन्न झाल्याने ; तात्काळ सदर ठिकाणी पोलीस पथक रवाना झाले. या गुन्हयातील आरोपी बबन आनंदा भोसले (वय २७ वर्षे ) रा. बाजारतळ बिडकीन ता.पैठण जि. औरंगाबाद यास सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.   चोरीचे सोने वितळवून लगड बनवली बबन ...

जागेच्या वादातून व्यावसायिकास ३० जणांच्या टोळक्याकडून मारहाण.

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव , ता. ३०:   घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील व्यावसायिक सुनील झोडगे यांना जागेच्या वादातून इंदुबाई गुंजाळ आणि इतर २५ ते ३० जणांच्या टोळक्याने बेकायदा जमाव जमवून बेदम मारहाण केली आहे. घोडेगाव येथील वडारआळी   परिसरातील गट क्र. ३५१/१ मध्ये इंदुबाई गुंजाळ आणि इतर काही व्यक्ती सिमेंटचे खांब रोवत असताना सुनील झोडगे त्यांना विचारणा करायला गेले असता , इंदुबाई गुंजाळ यांनी सुनील झोडगे यांना सदर जागा स्वतःची असल्याचे सांगत शिवीगाळ आणि दमदाटी करत त्यांच्यासोबत असणाऱ्या टोळक्याच्या सहाय्याने मारहाण करून जखमी केले. याबाबत सुनील सुर्यकांत   झोडगे   यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपी इंदुबाई गुंजाळ आणि इतर २५ ते ३० अज्ञात इसमांवर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून , घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वायाळ हे पुढील तपास करत आहेत.  

अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन विवाहितेवर वारंवार बलात्कार

  समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव, ता. ३०:   एका २९ वर्षीय महिलेला जबरदस्तीने शरीरसंबंधास भाग पाडून आणि त्याचे व्हिडीओ चित्रीकरण करून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी दीपक बबनराव कदम [रा. आंबेगाव गावठाण (घोडेगाव) , ता. आंबेगाव, जि. पुणे] याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १८ मार्च २०२० रोजी आणि मार्च २०२० मध्ये एके दिवशी दीपक कदमने पिडीत महिलेला तिच्या राहत्या घरात जबरदस्ती करून शरीर संबंधास भाग पाडले. पिडीत महिलेने विरोध केला असता, आरोपी कदम याने पिडीत महिलेस शिवीगाळ आणि मारहाण देखील केली. दरम्यान आरोपी कदम याने. त्या घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण केले. त्यानंतर आरोपी दीपक कदम याने पिडीत महिलेस सदर घटनेची वाच्यता केल्यास आपण ते व्हिडीओ चित्रीकरण पिडीत महिलेच्या नातेवाईक आणि दाखवू तसेच ते व्हायरल करू अशी धमकी दिली.  याबाबत पिडीत महिलेने धाडस करुन सदर हकीकत पोलिसांना सांगितल्याने आरोपी दीपक बबनराव कदम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिर...

भिमाशंकर येथून दर्शन घेऊन परतत असताना विद्यार्थ्यांचा भीषण अपघात.

घोडेगाव प्रतिनिधी : भिमाशंकर मधून दर्शन घेऊन मंचरकडे परतत असताना मोटार सायकलहून येत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थी जागीच ठार झाला तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. जखमींना पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास मंचर- भीमाशंकर रस्त्यावर शिनोली गावाजवळ झाला. ओमकार उमेश सुमंत वय २०, रा. शनिवार पेठ, सातारा असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तर सागर संतोष उगळे (वय २०, रा. काळजंबा वाशिम), नईम यासीद नदाफ (वय २० रा.कोतळी ता.शिरोळ, कोल्हापूर) हे दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनवमी असल्यामुळे शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयाचे तीन विद्यार्थी मोटरसायकल वरून पहाटे लवकरच भीमाशंकर येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन झाल्यानंतर परतत   असताना शिनोली गावामध्ये एका अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिली. स्थानिक गावकऱ्यांनी घोडेगाव पोलिस ठाण्या...

२१ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या.

पुणे प्रतिनिधी: मुलांना घरी शिकवण्यासाठी येणाऱ्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवले त्यानंतर मात्र त्याने लग्नासाठी नकार दिला. या कारणामुळे २१ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप केला जातोय. प्रियांका यादव (वय. २१ वर्ष) रा. उत्तमनगर, पुणे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत मृत तरुणीचा भाऊ प्रशांतकुमार दिलीप यादव (वय. २५ वर्ष) रा. मोरसा रेसिडेन्सी, उत्तमनगर याने फिर्याद दिली आहे.   या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी गुरींदरसिंग (रा. NDA क्वॉर्टर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी यांची बहीण प्रियंका बीएमसीसी महाविद्यालयात एम.कॉम.चे शिक्षण घेत होती. ती एनडीएमध्ये दोन आर्मी अधिकाऱ्यांच्या घरी जाऊन एक वर्षापासून त्यांच्या मुलांचा क्लास घेत होती. २५ मार्च रोजी ती सकाळी उठली. आईला जेवायला वाढ असे म्हणून साडेदहा वाजता आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली. बराच वेळ झाला तरी ती बाहेर न आल्याने तिच्या आईने दरवाजा वाजविला , तरी तिने प्रतिसाद दिला नाही. तेव्हा फिर्यादीने दरवाजा तोडला असता तिने पाण्याची टाकी ठेवण्यासाठी तय...

पारगाव तर्फे खेड ग्रामस्थांनी घेतली वृक्ष लागवडीची प्रतिज्ञा.

पेठ प्रतिनिधी: पारगाव तर्फे खेड गावामध्ये गायरान क्षेत्रावर   फोर्टीन ट्रीज संस्था वेताळे , मार्फत जवळपास १०,००० झाडांची लागवड करण्यात येणार असून त्यासाठी खड्डे घेण्याची सुरुवात आज करण्यात आली. सदर झाडे लागवडी बाबत पर्यावरण जागर प्रतिष्ठान संस्थेचे माध्यमातून गावकऱ्यांना आवाहन करण्यात आले होते. याप्रसंगी माजी सरपंच सचिन पानसरे यांनी वृक्ष लागवडी संबंधी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. यावेळी फोर्टीन ट्रीजचे अनंत तायडे साहेब यांनी , झाडांचे महत्त्व विशद केले व संस्था झाडे लावून तीन वर्षापर्यंत जपवणूक करेल व त्याचे सर्व उत्पन्न ग्रामपंचायतीला मिळेल असे सांगितले. सदर प्रसंगी पर्यावरण जागर मंच संस्थेचे सचिव राजन जांभळे यांनी गावकऱ्यांकडून वृक्ष प्रतिज्ञा म्हणून घेतली. कार्यक्रमामध्ये बाळासाहेब गवते ( सेवानिवृत्त वनाधिकारी) व एकनाथ वाळुंज ( सेवानिवृत्त बँक अधिकारी) यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमास सरपंच सचिन पानसरे , सरपंच सुदाम जिजाबा पठारे , विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुरेश अभंग , प्रशांत किसन आचार्य , ग्रामपंचायत सदस्य प्रशांत दशरथ पवार , गणेश गोविंद सावंत , अध्यक्ष शाळा व्यवस्थ...

नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात.

समर्थ भारत वृत्तसेवा आळेफाटा , ता. २९:   नगर-कल्याण महामार्गावर आळेगावच्या नजीक लवणवाडी येथे मालवाहतूक वाहनाने दोन दुचाकींसह ८ शेतमजुरांना चिरडले. ही घटना सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या भीषण अपघातामध्ये दोन चिमुकल्यासह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर ४ जण गंभीर जखमी झाले आहे. सुनंदाबाई रोहित मधे (वय. १८ वर्ष) , गौरव रोहित मधे (वय. ६ वर्ष) , रोहिणी रोहित मधे (वय. १८ महिने) , नितीन शिवाजी मधे (वय. २२ वर्ष) सर्व राहणार पळशीवनकुटे ता. पारनेर जि. अहमदनगर असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार , विरुद्ध दिशेने उभे असलेले वाहने अंधारात दिसून न आल्याने दुचाकीस्वार भरधाव वेगाने वाहनावर आदळले. त्यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला तर चौघांचा पुढील उपचारासाठी नगर येथे हलवले आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी घटनेची तात्काळ माहिती पोलिसांना कळवली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येऊन जखमींना आळेफाटा खाजगी रुंगालयात दाखले केले. अपघात इतका भयानक होता की , दुचाकीवरील १८ महिन्याची मुलगी बाजूच्या गटारात उडून पडली. याबाबत आळेफाटा पोलीस पुढील तपास करीत आहेत. ...

उंचखडक बुद्रुक येथे हिंस्त्र बिबट्या जेरबंद ..!

अकोले प्रतिनिधी : अकोले तालुक्यातील उंचखडक बुद्रुक आणि पंचक्रोशीत गेल्या काही दिवसांपासून हिंस्त्र बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे.या बिबट्यांनी अनेक शेतकऱ्यांवर रात्री अपरात्री शेतीला पाणी देण्यासाठी गेले असता जिवघेणे हमले केले होते. तसेच अनेक पाळीव प्राणी देखील यांनी फस्त केली आहे तरी या बिबट्यांची या परिसरात राजरोसपणे वावर असल्यामुळे लहान मुले देखील भयभीत झाली आहे. याची दखल घेत अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक तथा अगस्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अशोक देशमुख व उंचखडक बुद्रुक गावचे कार्यक्षम उपसरपंच महिपाल देशमुख यांनी गेल्या आठ दिवसांपूर्वीच स्वखर्चाने वनविभागाचा पिंजरा अशोकराव देशमुख यांच्या वस्तीनजीक आणून लावला होता . आज रात्री १:३० वाजता एक बिबट्या या सापळ्यात अडकला तरी आणखी दोन बिबटे हे मोकाटच असल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.  याप्रसंगी अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक तथा अगस्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अशोक देशमुख व उंचखडक बुद्रुक गावचे कार्यक्षम उपसरपंच महिपाल देशमुख यांनी विद्युत वितरण कंपनीकडे शेतीसाठी पुर्...

बिबट्याच्या हल्ल्यात म्हैस ठार.

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव , ता. २९:   आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्टयातील गंगापूर खुर्द येथे मंगळवारी (ता.२८) पहाटे तीनच्या सुमारास एका बिबट्याने गोठ्यात बांधून ठेवलेल्या एका म्हशीवर हल्ला करून तिला ठार केले.   गंगापुर खुर्द परिसरात घनदाट जंगल आहे. या परिसरामध्ये बिबट्यांचा वावर असून अधूनमधून या भागामध्ये बिबट्याचे दर्शन होते. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास अर्जुन भिमाजी नरवडे या शेतकऱ्याच्या घराजवळच्या गोठ्यात बांधून ठेवलेल्या तीन वर्षे वयाच्या म्हशीवर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात म्हैस मृत्यूमुखी पडली असून यात या शेतकऱ्याचे सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.   या अगोदर काही दिवसांपूर्वी बबन बाबूराव ठोसर यांच्या घराशेजारील गोठ्यातूनही अगदी अशाच प्रकारे म्हशीचं एक रेडकू बिबट्याने ठार केले होते. गेल्या पंधरा दिवसांतील ही दुसरी घटना असल्याने बिबट्याच्या हल्ल्याने परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत. तसेच गावातील नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरले आहे. सद्यस्थितीला गंगापूर पंचक्रोशीत शेतीकामे आणि कांदा काढणीची लगबग सुरू आहे याचं गांभीर्य लक्षात घेत...

दोन चोरांनी केली तब्बल 25 गाड्यांची चोरी

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी:  पुणे शहरासह पिंपरी चिंचवड परिसरात सध्या गु्न्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यात भूरट्या चोऱ्यांसह मोठ्या चोऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात चोरट्यांनी धूमाकूळ घातला असल्याने नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरी भागात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झालेली असतानाच पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट दोनने चांगली कामगिरी करत शहरात दुचाकी चोरणाऱ्या दोघांना, अट्टल चोरट्यांना वेगवेगळ्या ठिकाणी अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट दोनने कारवाई करत दोघा अट्टल चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून चोरलेल्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ज्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून 25 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तर या कारवाईत तब्बल 21 गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले. दुचाकी चोरीच्या प्रकरणात प्रदीप गायकवाड आणि आकाश घोडके अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडे आणखी चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. प्रदीप गायकवाड या चोरट्याकडून पोलिसांनी तब्बल 21 दुचाकी जप्त के...

जमिनीच्या वादातून महिलेला घरात घुसून मारहाण.

समर्थ भारत वृत्तसेवा टाकळ , हाजी , ता. २८:   टाकळी हाजी (ता. शिरुर) येथील उचाळे वस्ती येथे जमिनीच्या वादातून महिलेला घरात घुसून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे आकाश वाघमारे , रेखा वाघमारे , सपना आकाश वाघमारे व आशा बाळू साळवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टाकळी हाजी येथील उचाळे वस्तीत राहणाऱ्या नयना गायकवाड व आकाश वाघमारे यांच्यात जमिनीचा वाद सुरु असून नयना गायकवाड या घरात स्वयंपाक करत असताना आकाश वाघमारे हा काही महिलांसह गायकवाड यांच्या घरात घुसला दरम्यान सर्वांनी नयना यांना शिवीगाळ , दमदाटी करण्यास सुरुवात केली तर घरात आलेल्या महिलांनी नयना यांच्या अंगावर मिरची पूड टाकत त्यांना हाताने , लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तर आकाश याने लोखंडी गजाने नयना यांना मारहाण केली. याबाबत नयना राहुल गायकवाड (वय ३२ वर्षे) रा. टाकळी हाजी उचाळे वस्ती ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी आकाश वाघमारे , रेखा वाघमारे , सपना आकाश वाघमारे व आशा बाळू साळवे सर्व (रा. टाकळी हाजी उचाळे वस्ती ता. शिरुर जि. पुणे) यांच्य...

मारहाण करत मोबाईल लांबवणारे जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाची धडाकेबाज कारवाई.

समर्थ भारत वृत्तसेवा शिक्रापूर , ता. २८:     कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथून रात्रीच्या सुमारास रस्त्याने पायी जाणाऱ्या इसमाला शिवीगाळ , दमदाटी करुन मारहाण करत मोबाईल लांबवणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले असून विराज बाळासाहेब आरगडे व शैलेश अनंत उदार असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. कोरेगाव भीमा येथून पिंपळे जगताप रस्त्याने राम होळंबे हे १९ मार्च रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास पायी जात असताना दोघा युवकांनी दुचाकीहून येऊन राम यांना शिवीगाळ , दमदाटी करुन त्यांचा महागडा मोबाईल चोरुन नेला होता , याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोघा युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असताना सदर मोबाईल विराज अरगडे वापरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली त्यांनतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुषार पंदारे , पोलीस हवालदार जनार्दन शेळके , राजू मोमीन , योगेश हवालदार यांसह आदींनी कोरेगाव भीमा येथे सापळा लावत विर...

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू तर एक गंभीर.

समर्थ भारत वृत्तसेवा मांडवगण फराटा, ता.२८: इनामगाव (ता. शिरूर) येथे न्हावरे तांदळी रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्त्याने पायी जाणाऱ्या एका सोळा वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून या अपघातात  एक जेष्ठ व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. अपघातात मुत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव तुलसी यादव असून किसन आल्हाट (वय. ५५ वर्ष) रा. इनामगाव ता. शिरूर जि. पुणे असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या जेष्ठ  व्यक्तीचे नाव आहे.       मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दोघे जण हे रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान आपले काम उरकून रस्त्याने पायी घरी चालले होते. यावेळी रस्त्याने आलेल्या भरधाव वाहनाने दोघांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक हा घटनास्थळावरून फरार झाला आहे.या घटनेत गंभीर जखमी  झालेल्या दोघांना येथील खाजगी रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर या घटनेतील दुसऱ्या व्यक्तीला दौंड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत कुठलाही गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल झालेला नव...

ग्रामीण आदिवासी भागातील गावांमध्ये मुलींची सुरक्षा समिती स्थापन.

प्रतिनिधी: मिथुन मोजाड राष्ट्रीय स्थायी विकास संस्था ( NISD) ही सेवाभावी संस्था असून जुन्नर तालुक्यातील आदिवासी व ग्रामीण विभागामध्ये मेट्रोपोलीस प्रकल्प अंतर्गत किशोरवयीन मुलीसोबत ' किशोरी प्रकल्प राबवत आहे असे विजयकुमार शिंदे यांनी सांगितले व हा प्रकल्प संस्था अध्यक्ष डॉ. प्रकाश पाळंदे यांच्या मार्गदर्शनानुसार २० गावांमध्ये व वाड्या वस्तीवर प्रकल्प सुरू आहे.   या प्रकल्प अंतर्गत मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी नेतृत्वगुण विकास कौशल्य कार्यक्रम ,   गर्ल क्लब , महिला बचत गट , शालेय व आरोग्य विषयक प्रशिक्षणे , मुलींना सॅनिटरी पॅड व डिस्पोजल मशीन वाटप , स्टेशनरी , परसबाग विषयी प्रशिक्षण व वाटप   इत्यादी सारखे अनेक समाजशील उपक्रम राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून १५ ते २० गावांमध्ये मुलींची सुरक्षा राष्ट्रीय स्थायी विकास संस्थे अंतर्गत स्थापन केले आहे. या मीटिंगमध्ये मुलींच्या सुरक्षेचा आढावा वेळोवेळी घेतला जात असून त्यांच्या समस्या व समस्यांचे निराकरण करण्यासाठी संस्था सतत प्रयत्नशील असते. यामध्ये मुलींच्या शालेय व आरोग्य समस्या तसेच बालविवाह व मुलींचे हक्क याबाबत सतत...

बाजार समिती निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न.

पारनेर : प्रतिनिधी पुढील महिन्यात होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) या पक्षाच्या उद्धव ठाकरे यांचे विचार मानणाऱ्या शिवसैनिकाने उमेदवारीची मागणी केली तर त्याचा आम्ही विचार करू असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी पारनेर येथील आनंद लॉन्समध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्यावेळी आ. लंके हे बोलत होते. यावेळी अशोक सावंत , बाबाजी तरटे , सुदाम पवार , प्रशांत गायकवाड , गंगाराम बेलकर , शिवाजी बेलकर , अर्जुन भालेकर , नगराध्यक्ष विजय औटी , किसनराव रासकर , खंडू भुकन , डॉ. आबासाहेब खोडदे , रा. या. औटी , बा. ठ. झावरे , इंद्रभान गाडेकर , मारूती रेपाळे , नंदकुमार देशमुख यांच्यासह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.   यावेळी बोलताना लंके म्हणाले , कोणत्याही परिस्थितीत आपणास सर्व १८ जागा निवडून आणायच्या आहेत. इच्छुकांची संख्या मोठी आहे. तालुक्याच्या सर्व भागांमध्ये उमेदवारी द्यावी लागेल. मागील निवडणुकीत झालेल्या ...

धक्कादायक! आईने पोटच्या चार वर्षीय मुलीची चाकू भोसकून केली हत्या.

पुणे प्रतिनिधी: हडपसर येथे एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. आईने आपल्या पोटच्या चार वर्षीय मुलीची चाकू भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना काल सोमवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास हडपसर येथील सिद्धिविनायक दुर्गाकूर सोसायटी ससाणे नगर येथे पडली आहे. घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी आईला अटक केली आहे. दरम्यान , आरोपी आईने ही हत्या कोणत्या कारणातून केली हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. वैष्णवी महेश वाडेर (वय. ४ वर्ष) असं हत्या झालेल्या मृत मुलीचे नाव आहे.   आरोपी महिला ही तिच्या मुलीसोबत एकटीच राहत होती. महिन्यापूर्वी ती तेथे राहण्यास आली होती. बेकरी प्रॉडक्ट विक्रीचा व्यवसाय आरोपी महिला करत होती.   सोमवारी आरोपी महिला भाड्याचे घर खाली करणार होती त्यामुळे त्याठिकाणी घरमालक चौकशीसाठी गेले होते. मात्र सदर महिलेने आतमधून दरवाजा बंद केला होता. दरम्यान शेजारच्या असणाऱ्या नागरिकांनी महिलेला दरवाजा उघडण्यास   सांगितले. मात्र तिने दरवाजा उघडला नाही शेवटी घरमालकाने आणि शेजारील सर्वांनी दरवाजा उघडून आत जाऊन पाहिले असता मुलीचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ याची माह...

पिकअप जीपने दोन दुचाकींसह 8 जणांना चिरडल्याची दुर्दैवी घटना

जुन्नर प्रतिनिधी: जुन्नर तालुक्यातील आळेफाटा हद्दीत रात्रीच्या अंधारात पिकअपने दोन दुचाकींसह 8 जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातामध्ये एका चिमुकल्यासह दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर 6 जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.  नगर कल्याण महामार्गावर लवणवाडी येथे हा भीषण अपघात झाला आहे. रात्रीच्या अंधारात भरधाव पिकअपने दोन दुचाकीना उडवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात तीनही वाहनांची समोरासमोर धडक झाली आहे. यातील पिकअप जीपचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी घटनेची तात्काळ माहिती पोलिसांना कळवली. दरम्यान अपघातातील जखमी प्रवाशांना उपचारासाठी खाजगी रुग्णालायात दाखल करण्यात आले असून आळेफाटा पोलिस पुढील तपास करत आहेत.