नारोडी प्रतिनिधी:
नारोडी ता. आंबेगाव येथे संत सावता महाराज अखंड हरीनाम सप्ताह वर्षे ६८ वे सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात पार पडला. ह.भ.प.भास्कर महाराज जगदाळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली तसेच दरवर्षी प्रमाणे श्री संत सावता महाराज सेवा समाज मंडळ पुरस्कृत समाज भूषण जिल्हा स्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.यामध्ये राजकीय सामाजिक ,कृषी अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये आंबेगाव तालुका शिवभुषण पुरस्कार प्रदीप प्रताप वळसे पाटील ( संचालक ,भीमाशंकर सहकारी साखर कारखाना ), महात्मा ज्योतिबा फुले समाजभूषण पुरस्कार दत्ता शांताराम खंडेभराड ( चाकण समाजसेवक) , क्रांतीज्योती सावित्रीबाई समाजभूषण पुरस्कार रूपाली सुनील झोडगे (संचालिका ,शरद सहकारी संत), संत सावता माळी महाराज कृषी समाज भूषण पुरस्कार नितीन शंकर घोडेकर( कृषी उद्योजक) समाजभूषण पुरस्कार , मुक्तादेवी ग्रामभूषण पुरस्कार राजश्री नितीन भागवत (सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार ) यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले . मिळालेल्या पुरस्कारतून काम करण्याची प्रेरणा मिळते असे मत प्रदीप वळसे पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.