समर्थ भारत वृत्तसेवा
शिक्रापूर, (शेरखान शेख), ता. २५: पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती
तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल नुकतेच कारागृहातून
बाहेर आलेले असताना त्यांनी २६ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद आयोजित केली असून
बांदल काय बोलणार याकडे पुणे जिल्हयासह शिरुर तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागले
आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल एका बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी तब्बल बावीस महिने कारागृहात होते, ते नुकतेच कारागृहाबाहेर आलेले असून त्यांनी लगेचच मैदानात उतरण्यास सुरुवात केली आहे, तर यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पदावर असताना वरिष्टांकडून एक पत्र काढून त्यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती त्यांनतर बांदल यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नसताना अचानक कारागृहात गेले होते. सध्या बांदल हे कारागृहातून बाहेर आल्यानंतर लगेचच कामाला लागले आहेत. बांदल कधीही कोणत्याही निवडणुकीत काहीही करु शकतात अशी स्थिती आहे. तर अनेकदा बहुमत नसताना देखील त्यांनी सत्ता घडवलेली असल्याने बांदल काय करतील हा अंदाज कोणालाही नाही. मंगलदास बांदल यांनी रविवारी २६ फेब्रुवारी रोजी शिरुर येथे पत्रकार परिषद घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले असून आता बांदल काय गौप्यस्फोट करणार, काय राजकारणात काय भूमिका घेणार आणि राजकारणातील कोणती रणनीती आखणार किंवा कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार तसेच पुढील निवडणुकांना कोणत्या पद्धतीने सामोरे जाणार याकडे पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.