समर्थ भारत वृत्तसेवा
बनकर फाटा, ता. २५ : गणित हा विषय ग्रामीण भागातील शाळांमध्ये आजही अवघड समजला जातो. परंतु हाताच्या बोटावर अतिशय सोप्या पद्धतीने गणित सोडवण्याची कला ॲबॅकसने शिकवली, एव्हरेस्ट ॲबॅकस क्लासेसच्या स्नेहल लोहाटे यांनी ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून आंतरराष्ट्रीय ॲबॅकस स्पर्धेमध्ये उतरवले आणि अवघड वाटणाऱ्या गणिताला सोपे केले.
नुकत्याच झालेल्या ऑनलाईल ॲबॅकस स्पर्धेमध्ये ५ ते १४ वयोगटातील राज्यातून ३२९९ विध्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीला होता. तर एव्हरेस्ट क्लासेसच्या एकूण १४ विध्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन १०० टक्के निकाल दिला. पैकी राज्यात अव्वल दहा मध्ये या पैकी चार विद्यार्थिनींनी स्थान मिळवत डिंगोरे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्याने परिसरातील माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांकडून यशस्वी विद्यार्थी व मार्गशक शिक्षिका स्नेहल लोहाटे यांचे कौतुक होत आहे.
त्याच बरोबर पाच मिनिटात ४० पेक्षा जास्त गणिते सोडविणाऱ्या उर्वरित दहा विध्यार्थ्यांवर देखील अभिनंदनचा वर्षाव होताना दिसत आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवीण्यात आले. या वेळी सर्व पालक व विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशामागे स्नेहल लोहाटे यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले, असे मत यावेळी उपस्थित पालकांनी व्यक्त केले
राज्यात अव्वल दहा
मध्ये आलेल्या चार विद्यायार्थीनी
श्रावणी संतोष
पाडेकर - ५ मिनिटात ६६ गणिते
नियती तुषार तांबे
- ५मिनिटात ६४ गणिते
अदिती रुपेश
डुंबरे- ५ मिनिटात ५६ गणिते
वेदिका योगेश हांडे - ५ मिनिटात ५३ गणिते