समर्थ भारत वृत्तसेवा
तळेगाव ढमढेरे, ता.२७ : तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी.गुजर प्रशालेत
मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
साहित्यिक व ज्ञानपीठ पुरस्कारार्थी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे व पर्यवेक्षक मोहन ओमासे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रुपाली ढमढेरे यांनी मराठी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. प्रशालेतील विद्यार्थिनींनी काव्यवाचन केले, त्याचप्रमाणे नाट्यछटांचे सादरीकरण केले व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाषणात सहभाग घेऊन मराठी भाषेची महत्ती सांगितली. प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे यांनी विद्यार्थ्यांना राजभाषा मराठी दिनानिमत्त शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपाली ढमढेरे यांनी केले तर पर्यवेक्षक मोहन ओमासे यांनी आभार मानले.