Skip to main content

कुकडी नदीवरील भास्कर घाट येथे निरंकारी स्वयंसेवकांची स्वच्छता मोहीम.

समर्थ भारत वृत्तसेवा

जुन्नर, ता. २६:  संत निरंकारी मिशन मार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रविवार, दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी अमृत परियोजनेअंतर्गत 'स्वच्छ जल - स्वच्छ मनअभियान सकाळी ७ ते १२ या वेळेत संपन्न झाले. या अभियानामध्ये आंबेगाव-जुन्नर तालुक्यातील घोड नदी सह मीना, कुकडी नदीचा घाट क्षेत्रातील पाण्यात पडलेला प्लास्टिक कचरा, सेंद्रिय कचरा, अपशिष्ट पदार्थ, अनावश्यक झुडपे, खराब अन्नपदार्थ, जलपर्णी तसेच जलाशयांमध्ये आढळून येणारे शेवाळ, जाळीयुक्त काठ्यांचा वापर करुन स्वच्छ करण्यात आले. तसेच नदीकाठचा परिसर स्वच्छ करण्यात आला.            

संत निरंकारी मिशनचे पुणे झोनल प्रभारी ताराचंद करमचंदांनी यांनी या परियोजनेविषयी विस्तृत माहिती देताना सांगितले, की ही परियोजना संपूर्ण भारतदेशात २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ७३० शहरांमध्ये जवळपास ११०० हुन अधिक ठिकाणी राबविण्यात आली. अमृत परियोजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील मुळा, मुठा, इंद्रायणी, नीरा, भीमा, कऱ्हा, घोडनदी, पवना, कुकडी, मीना, वेळू अशा सर्व नद्यांवरील विविध घाट; त्याचबरोबर खडकवासला धरण, नाझरे धरण, कात्रज तलाव, पाषाण तलाव अशा ४१ ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यामध्ये स्थानिक निरंकारी सेवादल तसेच अन्य निरंकारी भक्तगण ५००० हून अधिक संख्येने सहभागी झाले होते. जल संरक्षणआणि जल बचावकरण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन करुन ते कार्यान्वित करणे हा या परियोजनेचा मुख्य उद्देश होता.
           
या अभियाना अंतर्गत जनजागृती करण्यासाठी पथनाट्यांद्वारे पाण्याचे महत्व आणि संरक्षणाच्या प्रति लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यात आली, तसेच पाण्यातून होणाऱ्या रोगांच्या बाबतीत माहिती देण्यात आली. ही परियोजना पर्यावरण संतुलन, प्राकृतिक सौंदर्य आणि स्वच्छतेसाठी केला जाणारा एक प्रशंसनीय व स्तुत्य प्रयत्न आहे, असे लेण्याद्री देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांनी शुभारंभप्रसंगी सांगितले. 

या परियोजने अंतर्गत २६ फेब्रुवारी २०२३ रोजी एकाच दिवशी संपूर्ण भारतभर निरंकारी मिशनच्या सुमारे १.५ लाखहुन अधिक स्वयंसेवकानी समुद्रकिनारे, नद्या, सरोवरे, तलाव, विहीर, झरे, पाण्याच्या टाक्या, नाले आणि जलप्रवाह इत्यादिंची स्वच्छता केली तसेच जल संरक्षणाची प्रेरणा दिली.



 

पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

मराठा समाज्याच्या वतीने रस्ता रोको

समर्थ भारत वृत्तसेवा : लाखनगाव, विजय कानसकर, आंबेगाव तालुक्यातील रोडेवाडी फाटा ( पोंदेवाडी ) 18 फेब्रुवारी रोजी सकल मराठा बांधव आणि महिलांच्या वतीने बेल्हा जेजुरी, अष्टविनायक मुख्य महामार्गावर ट्रक आडवा लावला. या आंदोलनाची प्रमुख मागणी होती जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्या व तात्काळ मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा, तसेच राज्यातील जे मराठा  आमदार, खासदार आहेत त्यांनी जरांगे पाटील यांच्या  पाठीशी खंबीरपणे उभे राहत मराठा आरक्षणाला जाहीर  पाठिंबा द्यावा. यासारख्या विविध मागण्या घेऊन मराठा  आंदोलकांनी हे आंदोलन रोडेवाडी फाटा ( पोंदेवाडी ) येथे केले आहे, याप्रसंगी प्रशासनाच्या वतीने आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत महामार्ग सुरळीत सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, अष्टविनायक तसेच बेल्हा जेजुरी या मुख्य महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आता शासन जरांगे पाटील यांच्या अटी पूर्ण करणार का पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको मराठा आंदोलनकर्ते करणार का? कारण जरांगे पाटील यांच...

लाखणगाव, पोंदेवाडी गावच्या हद्दीतून वाहने व इतर साहित्यांची चोरी

समर्थ भारत वृत्तसेवा: लाखणगाव पोंदेवाडी गावच्या हद्दीतून टेम्पो, बुलेट, स्प्लेंडर, व इतर साहित्य मिळून २ लाख ३१ हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि. २६/१/२०२४ ते २७/१/२०२४ चे दरम्यान घडली असून या बाबत अन्सार गफुर चौघुले रा. लाखनगाव ता. आंबेगाव यांनी पारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अन्सार चौगुले यांचा शेती व वखार व्यवसाय असून त्यांनी वखार व्यवसायासाठी पाच वर्षांपूर्वी एम. एच ०४ एस १३४८ टाटा कंपनीचा टेम्पो, तीन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १२ एम. टी २५४१ बुलेट गाडी, दोन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १४ एच.एक्स ५११९ स्प्लेंडर मोटरसायकल हि वाहने आहेत. फिर्यादी यांनी पोंदेवाडी गावच्या हद्दीत रोडेवाडी फाटा येथे वखारीचे साहित्य, टेम्पो, दुचाकी व इतर साहित्य ठेवण्यासाठी कंपाउंड तयार केले असून ओपन शेडमध्ये वखार तयार केली आहे. दिनांक २६ रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या गाड्या शेडमध्ये ठेवल्या होत्या रात्री दहा वाजता शेताला पाणी भरून ते ओपन शेड व वखारीचे शेडला कुलुप लावून तेथेच एका रूम मध्ये झोपले होते. दि. २७ रोजी...