Skip to main content

Posts

Showing posts from February, 2023

शेतीच्या वादावरुन चौघांनी संगनमत करून तरुणाला केली मारहाण.

समर्थ भारत वृत्तसेवा : शेतीच्या वादावरुन तरुणाला चौघांनी संगनमत करून मारहाण केली. यात लाठ्या-काठ्यांसह लोखंडी गजाचा वापर झाल्याने तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना साक्री तालुक्यातील हट्टी गावात शनिवारी सकाळी घडली. याप्रकरणी सोमवारी दुपारी निजामपूर पोलिसात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात साक्री तालुक्यातील हट्टी गावात राहणारा देविदास भटा थोरात (वय. ३५ वर्ष) याने निजामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार , साक्री तालुक्यातील हट्टी गाव शिवारात देविदास थोरात यांची शेतजमीन आहे. या ठिकाणी शेतीचा वाद पेटलेला आहे. या वादावरून चार जणांनी एकत्र येऊन थोरात यांच्याशी वाद घातला. वाद विकोपाला गेल्याने एकाने लोखंडाचा गज काढून त्याने मारहाण केली. दुसऱ्याने काठीने डोक्याला आणि पाठीवर हल्ला चढविला. देविदास यांची पुंजूबाई हिलाही मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर जखमी अवस्थेत दोघांना सोडून चौघांनी पळ काढला. जखमी अवस्थेत दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर देविदास थोरात यांनी निजामपूर पोलिस ठाण्यात सोमवारी दुपारी फिर्याद ...

कल्याण विशाखापट्टनम महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा.

समर्थ भारत वृत्तसेवा                                                   बेल्हे , ता. २६:   कल्याण विशाखापट्टनम महामार्गावर   रविवारी (दि. २६) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास   बेल्हे गावच्या हद्दीत   टेम्पो आणि पीकअपची समोरासमोर जोदार धडक बसून दोघांचा मृत्यू झाला असुन नऊ जण जखमी झाल्याची घटना घडली.                       कल्याण विशाखापट्टनम   महामार्गावरील बेल्हे (ता.जुन्नर) गावच्या हद्दीत रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नगरच्या दिशेने येत असलेली एम.एच.४३ बी.पी.३१०८ या पिकअप गाडीला जी.जे.०६ बि.टी.८९११ या मालवाहू टेंम्पो गाडीची जोरात धडक बसल्याने पिकअप गाडी मधील रिपुसुदन पांडे (वय ५४) व चंद्रकला पांडे(वय ४६ ) हे दोघे जण मुत्यूमुखी पडले तर चांदणी रिपुसुदन पांडे , पौर्णिमा मुरलीधर पांडे , अनिता मधुसुदन पांडे , पल्लवी रीपुसुदन पांडे , अर्पणा मुरलीधर पांडे , वसंत जितेंद्र रायसिंगभाई , म...

पहाटे लागलेल्या आगीमुळे चार कुटुंब आले उघड्यावर; लाखो रुपयांचे नुकसान.

समर्थ भारत वृत्तसेवा: करंजी येथे पहाटे भीषण आग लागली. या आगीत एक-दोन नव्हे तर तब्बल चार कुटुंब उघड्यावर आले. त्यांची गुरढोर होरपळून गेली. गोठे जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. या आगीत ३९ बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान दहा लाख ५१   हजार आठशे रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. करंजी लहाने येथे सकाळी चार वाजता ही आग लागली. दलित वस्तीत , अचानक लागलेल्या आगीत सुधाकर किसन कांबळे यांच्या ३९ बकऱ्या असलेल्या गोठा जळाला. आगीने एवढे रुद्र रूप धारण केले की , सकाळी संपूर्ण गाव झोपेत असताना आग सर्वत्र पसरली. सुधाकर किसन कांबळे यांच्या शेजारी असणारे दत्ता वानखेडे यांच्या सुद्धा म्हशीच्या गोठ्यालाही आग लागली. त्यांचेसुद्धा लाखाच्या वर नुकसान झाले. आग तिथे न थांबता बाजूच्या बाळू खंदारे यांच्यासुद्धा घराला लागली. त्यांच्या घरच्या अन्नधान्याची नासाडी झाली. तेथून पुढे शेजारीच राहणारे शेषराव सीताराम खिल्लारी यांच्यासुद्धा गुरांचा गोठा जळाला. त्यांची तिथे ठेवले असलेले तीन स्पिंकलर संच , अंदाजे ९० पाईप व शेतीचे संपूर्ण भांडवल जळून खाक झाले. गावकऱ्यांनी आग विझवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. परं...

गुजर प्रशालेत मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा.

समर्थ भारत वृत्तसेवा तळेगाव ढमढेरे , ता.२७ :   तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी.गुजर प्रशालेत मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. साहित्यिक व ज्ञानपीठ पुरस्कारार्थी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे व पर्यवेक्षक मोहन ओमासे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रुपाली ढमढेरे यांनी मराठी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. प्रशालेतील विद्यार्थिनींनी   काव्यवाचन केले , त्याचप्रमाणे नाट्यछटांचे सादरीकरण केले व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाषणात सहभाग घेऊन मराठी भाषेची महत्ती सांगितली. प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे यांनी विद्यार्थ्यांना राजभाषा मराठी दिनानिमत्त शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपाली ढमढेरे यांनी केले तर पर्यवेक्षक मोहन ओमासे यांनी आभार मानले.  

शाहिरांनी धमण्यातली रग जिवंत ठेवण्याचे कार्य केले : महावीर जोंधळे.

समर्थ भारत वृत्तसेवा तळेगाव ढमढेरे , ता. २७ :   शाहिरांनी धमण्यातली रग जिवंत ठेवण्याचे कार्य केले. संतांचा रोज एक अभंग समजून घेतला तर जगणे समृद्ध होते. बहिणाबाईंची कविता आयुष्याचा अर्थ सांगते म्हणून नव्या पिढीने वाचनाकडे जाणीवपूर्वक वळले पाहिजे असे मत साहित्यिक महावीर जोंधळे यांनी व्यक्त केले.                पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पौड रोड येथील मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात प्रख्यात साहित्यिक कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस "जागतिक मराठी भाषा दिन" म्हणून साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या मराठी विभागाने यानिमित्त "लेखक आपल्या भेटीला" या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ लेखक व पत्रकार महावीर जोंधळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.जी.पी.सातव हे होते. याप्रसंगी बोलताना डॉ.जोंधळे म्हणाले की आपण घडत असताना   वि.वा. शिरवाडकर यांचा प्रत्यक्ष सहवास लाभला. इंदिरा संत , शांताबाई शेळके , ग. दि.माडगूळकर , विंदा करंदीकर , ग्रेस आदी मान्यवरांच्या सानिध्यात आल्यानंतर लेखक...

आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत कारचा चक्काचूर; दोघांचा जागीच मृत्यू.

समर्थ भारत वृत्तसेवा: नागपूर राष्ट्रीय महामार्गावर दाभड हद्दीतील बाबा पेट्रोल पंपाजवळ कार आणि आयशर ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री नांदेड ते अर्धापूर मार्गे जाणाऱ्या भरधाव कारने दुभाजकावरुन दुसऱ्या बाजूने समोरून येणाऱ्या आयशरला जोरदार धडक दिली. भरधाव कार क्र. एम.एच ३७ जी ९८८९ ने दुभाजकावरुन दुसऱ्या बाजूने समोरून येणाऱ्या आयशर क्र.एम.एच.१३ सी.यु.४६४४ ला जोरदार धडक दिली. मागून येणारी कार आय ट्वेंटी होती. या गाडीतील अमित विठ्ठल घुगे वय २९ रा. तरोडा आणि आयशरमधील रामा प्रल्हाद डोंगरे (वय ५० वर्ष) रा. इंचगाव ता. मोहोळ जि.सोलापूर यांचं जागीच निधन झालं. या भीषण अपघाताची माहिती मिळताच जखमींना नांदेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महामार्गांवर अपघातांचं प्रमाण सतत वाढतं आहे. अतिवेगामुळे अपघाताचं प्रमाण वाढल्याचं चित्र आहे. दुभाजकाच्या दुसऱ्या बाजूने येणाऱ्या आयशर ट्रकला दिलेल्या धडकेत कारचा चक्काचूर झाला आहे. समोरुन येणारा आयशर ट्रक आणि कारची धडक इतकी भीषण होती की या अपघातात संपूर्ण कारचा चुराडा झाला आहे. तसंच या कारमध...

शिक्रापूर पोलिसांकडून औद्योगिक वसाहतीत आवाहन फलके.

समर्थ भारत वृत्तसेवा शिक्रापूर , ता. २७:   शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये औद्योगिक वसाहतीत कंपन्या व उद्योजकांना ठेक्यासाठी त्रास देऊन दमदाटी सह खंडणी मागण्याचे प्रकार वाढत असल्याने शिक्रापूर पोलिसांनी नुकतेच औद्योगिक वसाहतीत वेगवेगळे आवाहनात्मक फलक लावून कंपन्यांना पाठबळ देण्याचे काम सुरू केले आहे. शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शिक्रापूर , सणसवाडी , कोरेगाव भीमा , पिंपळे जगताप , वढू बुद्रुक , तळेगाव ढमढेरे यांसह आदी ठिकाणी औद्योगिक वसाहतीत काही युवकांकडून ठेक्यासाठी कंपन्यांना त्रास देणे , खंडणी मागणे यांसारख्या घटना घडत असल्याने निदर्शनास आल्याने पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये औद्योगिक वसाहतीत आवाहनाचे फलक लावत त्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक टाकलेले असून कंपन्यांना वेगवेगळ्या ठेक्यासाठी कोणी धमकावत असल्यास , त्रास देत असल्यास , विविध संघटना जबरदस्ती करत असल्यास , कोणी दहशत करत असल्यास , खंडणी मागत असल्यास , अडवणूक करत असल्यास तसेच माथाडी कामगार कामावर न ठेवता पैशाची मागणी करत असल्यास तसेच कोणीही आर्थिक पिळवण...

शिक्रापूरातील व्यापाऱ्यांचा विद्युत वितरण अधिकाऱ्याला घेराव.

समर्थ भारत वृत्तसेवा शिक्रापूर , ता. २७:   शिक्रापूर ता. शिरुर येथील पाबळ चौकातील रोहित्र नादुरुस्त झाल्याने मागील आठवड्यापासून वीज पुरवठा खंडित असल्याने संतप्त व्यापाऱ्यांनी विद्युत वितरण विभागाच्या सहाय्यक अभियंत्याला घेराव घालत वीज पुरवठा सुरळीत करुन देण्याची मागणी करत पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. शिक्रापूर ता. शिरुर येथील पाबळ चौकातील स्टेट बँक परिसरात वीज पुरवठा करणारे रोहित्र आठ दिवसांअसून जळलेले असल्याने परिसरात वीज नाही त्याचा परिणाम शालेय मुलांच्या अभ्यास व व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर होत आहे , वारंवार मागणी करुन देखील विद्युत वितरण विभाग रोहित्र दुरुस्त करत नसल्याने आज काही व्यापारी व ग्रामस्थांनी विद्युत वितरण कार्यालयावर मोर्चा काढला , यावेळी ओंकार हिरवे , ऋषिकेश तकटे , रविराज शिंदे , कमलाकर कुलकर्णी , यशवंत टाकळकर , प्रवीण काळोखे , किशोर देवासी , विलास थिटे , किशोर झुंजारे , विकास ससाणे , गोरख कळमकर , राजेंद्र करंजे यांसह आदी उपस्थित होते , यावेळी व्यापाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आमचा वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा आम्ही आपल्या कार्यालयासमोर आंदोलन ...

कुकडी नदीवरील भास्कर घाट येथे निरंकारी स्वयंसेवकांची स्वच्छता मोहीम.

समर्थ भारत वृत्तसेवा जुन्नर , ता. २६:   संत निरंकारी मिशन मार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रविवार , दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी अमृत परियोजनेअंतर्गत ' स्वच्छ जल - स्वच्छ मन ’ अभियान सकाळी ७ ते १२ या वेळेत संपन्न झाले. या अभियानामध्ये आंबेगाव-जुन्नर तालुक्यातील घोड नदी सह मीना , कुकडी नदीचा घाट क्षेत्रातील पाण्यात पडलेला प्लास्टिक कचरा , सेंद्रिय कचरा , अपशिष्ट पदार्थ , अनावश्यक झुडपे , खराब अन्नपदार्थ , जलपर्णी तसेच जलाशयांमध्ये आढळून येणारे शेवाळ , जाळीयुक्त काठ्यांचा वापर करुन स्वच्छ करण्यात आले. तसेच नदीकाठचा परिसर स्वच्छ करण्यात आला.              संत निरंकारी मिशनचे पुणे झोनल प्रभारी ताराचंद करमचंदांनी यांनी या परियोजनेविषयी विस्तृत माहिती देताना सांगितले , की ही परियोजना संपूर्ण भारतदेशात २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ७३० शहरांमध्ये जवळपास ११०० हुन अधिक ठिकाणी राबविण्यात आली. अमृत परियोजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील मुळा , मुठा , इंद्रायणी , नीरा , भीमा , कऱ्हा , घोडनदी , पवना , कुकडी , मीना , वेळू अशा सर्व नद्यांवरील व...

अज्ञात व्यक्तिने लावली गव्हाच्या गंजीला आग; वर्षभराच्या बेगमीची झाली राखरांगोळी.

समर्थ भारत वृत्तसेवा   बेल्हे , ता. २७:   शिंदेवाडी (ता.जुन्नर) येथील चौत्रा वस्ती येथील गट नंबर ५९९ मधील गोरख पंढरीनाथ हांडे यांच्या शेतात असलेल्या कापणी करुन ठेवलेल्या गव्हाच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावून पेटवून दिल्याची घटना घडली असून शेतक-याने कष्टाने पिकवलेल्या व वर्षभर आपल्या कुटूंबाच्या बेगमीसाठी असलेल्या धान्याचं नुकसान झाले असून अशा नीच प्रवृत्तीच्या माणसांचा शोध घेऊन शिक्षा झाली पाहिजे अशी भावना शेजारील शेतक-यांनी व्यक्त केली. आग लागल्याचे दिसताच शेजारी असणाऱ्या शेतकरी व ग्रामस्थांनी घटनास्थळी त्वरीत धाव घेतली व आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत संपूर्ण गंजीने पेट घेतला होता व त्यामध्ये संपूर्ण गव्हाची व गहू झाकून ठेवलेल्या प्लास्टिकच्या कागदाची राखरांगोळी झाली होती. सदर अज्ञात व्यक्तीविरोधात पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी शिंदेवाडीच्या पोलीस पाटील उषा शिंदे व ग्रामस्थांनी केली.   तलाठी व ग्रामसेवक यांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून सदर शेतक-याचे अंदाजे ८० , ००० रुपयांचे नुकनास झाले असून तसा अहवाल तहसिल कार्यालयास पाठविल्याचे आणे-...

कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी उतरले रस्त्यावर.

समर्थ भारत वृत्तसेवा: कांद्याचे भाव कोसळत असल्याने विविध मागण्यांसाठी सोमवारी महाविकास आघाडीतर्फे नांदगाव-येवला मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे नांदगाव तालुक्यातील पाच माजी आमदारांनी या रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला. या आंदोलनामुळे नांदगाव-येवला मार्गावरील वाहतूक दीड ते दोन तास ठप्प होती. सोमवारी कांदा व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस , राष्ट्रवादी , शिवसेना ठाकरे गट यासह सहकारी राजकीय पक्ष , संघटनांनी एकत्रित येत नांदगावमध्ये रास्ता-रोको आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व तालुक्यातील अॅड. अनिल आहेर , अॅड. जगन्नाथ धात्रक , पंकज भुजबळ , संजय पवार , राजाभाऊ देशमुख या पाच माजी आमदारांनी केले. त्यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी गणेश धात्रक , संतोष बळीद , विजय पाटील , हरिश्वर सुर्वे , संतोष गुप्ता व कार्यकत्यांनी आंदोलनात सहभागी होत रस्त्यावर ठाण मांडले. आंदोलकांनी तब्बल दीड ते दोन तास नांदगाव-येवला मार्ग रोखून धरला. या वेळी रस्त्यावर वाहनांची एकच गर्दी झाली. तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आहेत मागण्या:- ...

नारोडीमध्ये समाज भूषण पुरस्कार सोहळा संपन्न.

नारोडी प्रतिनिधी: नारोडी ता. आंबेगाव  येथे संत सावता महाराज अखंड हरीनाम सप्ताह वर्षे ६८ वे सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात पार पडला. ह.भ.प.भास्कर महाराज जगदाळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली तसेच दरवर्षी प्रमाणे श्री संत सावता महाराज सेवा समाज मंडळ पुरस्कृत  समाज भूषण जिल्हा स्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.यामध्ये राजकीय सामाजिक ,कृषी अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये आंबेगाव तालुका शिवभुषण पुरस्कार प्रदीप  प्रताप  वळसे पाटील ( संचालक ,भीमाशंकर सहकारी साखर कारखाना ), महात्मा ज्योतिबा फुले समाजभूषण पुरस्कार दत्ता शांताराम खंडेभराड   ( चाकण समाजसेवक) , क्रांतीज्योती सावित्रीबाई समाजभूषण पुरस्कार  रूपाली सुनील झोडगे (संचालिका ,शरद सहकारी संत), संत सावता माळी महाराज कृषी समाज भूषण पुरस्कार नितीन  शंकर घोडेकर( कृषी उद्योजक) समाजभूषण पुरस्कार , मुक्तादेवी ग्रामभूषण पुरस्कार राजश्री नितीन भागवत (सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार ) यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले . ...

प्रेयसी संसारात करत होती हस्तक्षेप; प्रियकराने पत्नीच्या मदतीने प्रेयसीचा केला खून.

  पुणे प्रतिनिधी : संसारात प्रेयसी हस्तक्षेप करत असल्याने प्रियकराने पत्नीच्या मदतीने प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची घटना कोंढवा भागात घडली. प्रियकराने प्रेयसीचा मृतदेह लटकावून तिने गळफास घेतल्याचा बनाव रचला. वैद्यकीय अहवालात प्रेयसीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर दाम्पत्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फातिमाबी शेख (वय ३४ , रा. कोंढवा खुर्द) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी रईस हनीफ शेख (वय ४०) आणि त्याची पत्नी शबाना (वय ३५ , दोघे रा. शिवनेरीनगर , कोंढवा) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फातिमाबी आणि रईस यांचे प्रेमसंंबंध होते. फातिमाबी संसारात हस्तक्षेप करत असल्याने प्रियकर रईस आणि पत्नी शबाना यांनी फातिमाबीचा खून करण्याचा कट रचला. तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर फातिमाबीचा मृतदेह लटकावून तिने गळफास घेतल्याचा बनाव रचला. रईसने फातिमाबीला ससून रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीत फातिमाबीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यानंत...

खैरेनगर मध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार एक गंभीर.

समर्थ भारत वृत्तसेवा शिक्रापूर , ता. २५:   खैरेनगर ता. शिरुर येथील रस्त्यावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसून मनोज पांडुरंग मोरे या युवकाचा जागीच मृत्यू होऊन अक्षय मोहन बोराडे हा गंभीर जखमी झाला असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. खैरेनगर ता. शिरुर येथून अक्षय बोराडे व त्याचा मित्र मनोज मोरे हे दोघे २४ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील एम एच २३ बि एफ ०१७७ या दुचाकीहून कान्हूर मेसाई हून पाबळ बाजूकडे चाललेले असताना कान्हूर मेसाई बाजूने आलेल्या अज्ञात कारची दोघांच्या दुचाकीला जोरदार धडक बसून दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस शिपाई राहुल वाघमोडे यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने दोघा जखमींना उपचारासाठी पाठवून दिले. या अपघातात मनोज पांडुरंग मोरे वय २३ वर्षे रा. कासार पिंपळगाव ता. पाथर्डी जि. अहमदनगर हा मयत झाला तर अक्षय मोहन बोराडे वय २२ वर्षे रा. कासार पिंपळगाव ता. पाथर्डी जि. अहमदनगर हा गंभीर जखमी झाला असून याबाबत सुहास विष्णू शेटे वय २५ वर्षे रा. चाकण ता. खेड जि. पुणे मूळ रा. कसबापेठ ता. पाथ...

महावितरण विभागाकडून मागणी कामांची पाहणी व पूर्ण करण्याचे आश्वासन, दैनिक समर्थ भारतच्या वृत्ताचा परिणाम.

समर्थ भारत वृत्तसेवा कवठे येमाई , ता.२५:     महावितरण विभागाकडून कवठे येमाई (ता. शिरूर) येथील ग्रामस्थांकडून मागणी करण्यात आलेल्या कामांची पाहणी करून ती कामे लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. यामध्ये मुख्यतः पुरातन फत्तेश्वर मंदिराच्या आवारात असणाऱ्या ३३/२२ के.व्ही. ट्रांसफार्मरची जागा बदलण्याची मागणी करण्यात आली होती. त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन शिरुरचे उपकार्यकारी अभियंता सोमनाथ माने यांनी प्रत्यक्ष जागेला भेट दिली व तो ट्रान्सफॉर्मर स्थलांतरित करण्याचे आश्वासित केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बाजीराव उघडे व भरत भोर हे उपस्थित होते. माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी कार्यकारी अभियंता महावितरण केडगाव यांना कवठे पांजरपोळ नवीन रोहित्र बसविणे , कवठे गणेश नगर माळीमळा नवीन रोहित्र बसवणे , कवठे फत्तेश्वर मंदिर रोहित्र स्थलांतर करणे , कवठे डांगे चौक लाईन स्थलांतरित करणे , कवठे काळे आळी गावठाण तारा ओढणे या कामांबद्दल पत्र दिले होते. यासाठी माजी पंचायत समिती सदस्य सुदाम इचके , माजी सरपंच दीपक रत्नपारखी , सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सांडभोर , बाळासाहेब डां...

नैसर्गिक संकटांमुळे शेत नापीक झाले, कर्ज फेडण्यासाठी सावकाराचा तगादा; कुटुंबाच्या पोशिंद्याने आयुष्यच संपवलं.

समर्थ भारत वृत्तसेवा: सततची नापिकी , शेतावर येणारे अनेक संकट यातून मार्ग काढताना पैसा उरला नाही. यामध्येच खासगी सावकारासह बँकांचे कर्ज हप्ते कसे फेडणार , या विवंचनेत असलेल्या बीड जिल्ह्यातील रांजणी येथील ४२ वर्षीय शेतकरी अशोक सुखदेव औंधकर यांनी आत्महत्या केली आहे. त्यांचे शेत सततच्या नैसर्गिक संकटांमुळे नापीक झाले होते. खासगी सावकाराचं कर्ज , बँकेकडून घेतलेले उसने पैसे असा दुहेरी कर्जाचा डोंगर त्यांच्या डोक्यावर होता. बँक आणि सावकाराने कर्ज फेडण्यासाठी सततचा तगादा लावल्याने अशोक औंधकर यांनी स्वत:चे जीवन संपविणे या मार्गाचा अवलंब केला. आणि त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. औंधकर यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली दोन भाऊ आई-वडील आणि एक बहीण असा मोठा परिवार आहे. कुटुंबप्रमुख असणाऱ्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर पुढे कुटुंबाचं काय होणार ? मुलींचे लग्न मुलाचं लग्न शिक्षण या गोष्टीकडे कोण बघणार ? हे प्रश्न औंधकर कुटुंबासमोर आ वासून उभे राहिले आहेत. अशोक औंधकर यांचा मृतदेह शवाविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंददेखील झाली आहे. मागील का...

मंगलदास बांदल आज काय बोलणार ? बांदल यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष!

समर्थ भारत वृत्तसेवा शिक्रापूर , ( शेरखान शेख) , ता. २५:   पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल नुकतेच कारागृहातून बाहेर आलेले असताना त्यांनी २६ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद आयोजित केली असून बांदल काय बोलणार याकडे पुणे जिल्हयासह शिरुर तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल एका बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी तब्बल बावीस महिने कारागृहात होते , ते नुकतेच कारागृहाबाहेर आलेले असून त्यांनी लगेचच मैदानात उतरण्यास सुरुवात केली आहे , तर यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पदावर असताना वरिष्टांकडून एक पत्र काढून त्यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती त्यांनतर बांदल यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नसताना अचानक कारागृहात गेले होते. सध्या बांदल हे कारागृहातून बाहेर आल्यानंतर लगेचच कामाला लागले आहेत. बांदल कधीही कोणत्याही निवडणुकीत काहीही करु शकतात अशी स्थिती आहे. तर अनेकदा बह...

ॲबॅकस स्पर्धेत डिंगोरे येथील चार विध्यार्थी अव्वल दहा मध्ये.

समर्थ भारत वृत्तसेवा बनकर फाटा , ता. २५ :   गणित हा विषय ग्रामीण भागातील शाळांमध्ये आजही अवघड समजला जातो. परंतु हाताच्या बोटावर   अतिशय सोप्या पद्धतीने गणित सोडवण्याची कला ॲबॅकसने शिकवली , एव्ह रेस्ट  ॲ बॅकस क्लासेसच्या स्नेहल लोहाटे यांनी ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून आंतरराष्ट्रीय ॲबॅकस स्पर्धेमध्ये उतरवले आणि अवघड वाटणाऱ्या गणिताला सोपे केले. नुकत्याच झालेल्या ऑनलाईल ॲबॅकस स्पर्धेमध्ये ५ ते १४ वयोगटातील राज्यातून ३२९९ विध्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीला होता. तर एव्हरेस्ट क्लासेसच्या एकूण १४ विध्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन १०० टक्के निकाल दिला. पैकी राज्यात अव्वल दहा मध्ये या पैकी चार विद्यार्थिनींनी स्थान मिळवत डिंगोरे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्याने परिसरातील माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांकडून यशस्वी विद्यार्थी व मार्गशक शिक्षिका स्नेहल लोहाटे यांचे कौतुक होत आहे. त्याच बरोबर पाच मिनिटात ४० पेक्षा जास्त गणिते सोडविणाऱ्या उर्वरित दहा विध्यार्थ्यांवर देखील अभिनंदनचा वर्षाव होताना दिसत आहे.   सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सन्मानचिन...

कवठे येमाई येथील गावठी दारूभट्टी वर कारवाई; १ लाख ६० हजार रु. मुद्देमाल केला नष्ट.

समर्थ भारत वृत्तसेवा कवठे येमाई , ता. २५ :    कवठे येमाई  ( ता.शिरूर) येथील घोडनदी किनार गांजेवाडी शिवारामधे गायरान जमीनीत असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टी शिरूर पोलिस स्टेशन अंकित टाकळी हाजी औट पोस्टच्या पोलिसांनी कारवाई करत हि भट्टी उध्वस्त केली आहे.   मानवी आरोग्यास हानीकारक गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याकरीता बॅरलमध्ये कच्चे रसायन भिजत घालून त्याची दारू आणि त्याच ठिकाणी केमीकलयुक्त ताडी तयार करुन ग्राहकास विक्री करत असल्याने एका ईसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमारे १ लाख ६० हजार रुपये किमतीचे १६ बॅरल मधील ३२०० लिटर कच्चे रसायन , प्लास्टिक चे कॅन , ग्लास तसेच ताडी असा मुद्देमाल जागेवरच पंचांसमक्ष नष्ट करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर कारवाई सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर , पोलीस शिपाई दिपक पवार , विशाल पालवे यांच्या पथकाने केली. शिरूरच्या बेट भागात अवैध धंद्यांना उधाण आले असून बहुतांशी घोडनदी , कुकडी नदी किनारी सुरू असलेल्या अशा सर्वच दारुभट्ट्यांवर कारवाई होणार का ? याकडे बेट भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. तसेच कुकडी , घोड नदीच्या पली...