समर्थ भारत वृत्तसेवा
शिक्रापूर, ता. २८: शिक्रापूर ता. शिरुर येथील चौकातून बसने प्रवास
करणाऱ्या महिलेचे तब्बल सव्वा सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने
लांबवल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर
गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिक्रापूर
ता. शिरुर हे माहेर असलेल्या कांता शिनलकर सध्या ठाणे येथे राहत असून आबेगाव
तालुक्यातील लोणी धामणी गावच्या यात्रेसाठी शिनलकर या गावी आलेल्या होत्या, शिक्रापूर येथे माहेरी थांबून
२७ जानेवारी रोजी पुन्हा शिक्रापूर पुणे बस ने प्रवास करत असताना शिनलकर यांनी
त्यांचे सव्वा सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने पिशवी मध्ये ठेवलेले होते, पुणे येथे गेल्यानंतर त्यांच्या पिशवीतील दागिने गायब असल्याचे निदर्शनास
आल्याने कांता विलास शिनलकर ५६ रा. बदलापूर ठाणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन
येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल
केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस नाईक बापू हडागळे हे करत आहे.