समर्थ भारत वृत्तसेवा
टाकळी हाजी ता. २९: शिरुर शहरात अस्लम जैनुदिन
सय्यड याने एका अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने वारंवार
बलात्कार केल्याने त्या पुरुषावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आल्याची
माहिती शिरूर पोलिस ठाण्याकडून समजली आहे.
शिरूर शहरामध्ये ऑक्टोबर २०२२ ते दि. २८ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान वेळोवेळी शिरूर येथील सदनिकेत अस्लम जैनुदिन सय्यद रा. आंबेडकर नगर, लाटेआळी, शिरुर, जि. पुणे. याने एका अल्पवयीन मुलीला सामान घेण्यासाठी बोलावून तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेवून त्या अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुध्द लैंगिक अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. याबाबत शिरूर पोलिस स्टेशनमध्ये पोक्सोसह; अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदयासह इतर गुन्हे दाखल आहे. पुढील तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी करत आहेत.
हा गुन्हा दाखल
झाल्यानंतर आरोपी फरार झाला असून त्याला पकङण्यासाठी शिरुर पोलिसांची तीन पथके
रवाना केली असून; त्याला लवकर गजाआड केले जाईल. (यशवंत गवारी ,पोलिस उपविभागीय
आधिकारी)