समर्थ भारत वृत्तसेवा
पारगाव, ता. २८: शिरदाळे ( ता.आंबेगाव ) भारताचा ७४ प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदात उत्साहात आणि अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ध्वजापूजन शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष निवृत्ती तांबे, सदस्य दीपाली संदेश तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील शेतकरी शांताराम चौधरी व निवृत्ती मिंडे यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शंकर दत्तात्रय तांबे यांच्या सप्तनीक व योगेश मारुती तांबे सप्तनीक तसेच सुनील मनोहर रणपिसे सप्तनीक या मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत प्रांगणात ग्रामपंचायत ध्वजारोहण संपन्न झाले. दरवर्षी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते व गावातील पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम घेत असतो परंतु या वर्षी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच तसेच सर्व सदस्य कमिटीने निर्णय घेत हा मान गावातील विधवा महिला, सरकारी सेवेतील मुले व त्यांचे पालक तसेच मा. सैनिक व गुणवंत विद्यार्थी यांना देण्याचे ठरवले होते.
ग्रामपंचायतने एक आदर्श उपक्रम राबविला असल्याचे कौतुक यावेळी ग्रामस्थांनी केले. यावेळी शिरदाळे गावच्या सरपंच वंदना गणेश तांबे, उपसरपंच मयुर संभाजी सरडे, मा. सरपंच मनोज तांबे, ग्रामपंचायत सदस्य बिपीन चौधरी, गणेश तांबे, संतोष रणपिसे, पोलीस पाटील कल्पना चौधरी, मुख्याध्यापक गाढवे, अंगणवाडी सेविका शांताबाई चौधरी, जया रणपिसे तसेच ग्रामस्थ आणि युवक व विद्यार्थी मित्र उपस्थित होते. कु. राजवीर योगेश तांबे यांच्या प्रथम वाढदिवसानिमित्त शाळेला टेबल व अंगणवाडीसाठी डबल बर्नर शेगडी भेट देण्यात आली.
विधवा
महिलांचा सन्मान करणारी ग्रामपंचायत
ग्रामपंचायत ध्वजपूजन; शालन तांबे, रामदास तांबे, सवित्राबाई चौधरी, बाळू रखमा चौधरी, मीना तांबे, सुरेश गेनभाऊ तांबे
गावची निस्वार्थी सेवा करणारे कै. महादू भिका तांबे यांचे चिरंजीव इंदूबाई तांबे, सुभाष महादू तांबे
यांना पूजनाचा मान दिला. तर माजी सैनिक कचर तांबे,
सोसायटी संचालक कोंडीभाऊ तांबे व
कांताराम तांबे यांना नारळ वाढवण्याचा मान दिला. यावेळी ग्रामपंचायत ध्वजारोहण प्रथमच गावातील विधवा महिलांच्या
हस्ते करण्यात आले. यात गुंफाबाई महादू रणपिसे, गाजराबाई
राधु थांबे, कांताबाई कैलास तांबे,
कासुबाई विश्वनाथ तांबे, कचराबाई
नामदेव तांबे या महिलांच्या हस्ते करण्यात आले.