समर्थ भारत वृत्तसेवा
बेल्हे, ता. ३०: गावातील जागृत स्वयंभू असलेली देवस्थाने श्री नागेश्वर व पोळेश्वर ही दोन्ही मंदिरे भव्यदिव्य आणि देखण्या स्वरूपात बांधण्यात आली असून या मंदिराचा जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा गुरुवार व शुक्रवार (दि.२/३ फेब्रुवारी) रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रदिप पिंगट यांनी दिली.
श्री नागेश्वर व पोळेश्वर या
दोन्ही मंदिराचा नुकताच ग्रामस्थांच्यावतीने जीर्णोद्धार करण्यात आला असून सुंदर व देखणी अशी मंदिरे
ग्रामस्थांच्या वतीने उभारण्यात आली असून या मंदिरांच्या जीर्णोद्धार सोहळ्याच्या
निमित्ताने गुरुवार (दि.२) रोजी नवीन मूर्तींची मिरवणूक, होमहवन व अभिषेक तर
शुक्रवार (दि.३) रोजी हभप सुदाममहाराज बनकर यांच्या हस्ते नवीन मूर्ती
प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असून त्यानंतर जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ येथे हभप
समाधानमहाराज शर्मा यांचे किर्तन व समस्त ग्रामस्थ बेल्हे यांच्या वतीने
महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा पार पाडण्यासाठी बेल्हे परिसरातील
सर्व ग्रामस्थांनी मदत केली असल्याचे प्रदिप पिंगट यांनी सांगितले.