समर्थ भारत वृत्तसेवा
घोडेगाव, ता. ३०: कोटमदरा ता.आंबेगाव येथे,दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही, नयन मनोहर श्री दत्त
मंदिराचा तृतीय वर्धापन दिन सोहळा मोठया उत्साहात व भक्तीभावाने संपन्न झाला.
डोंगराच्या कुशीत वसलेल्या कोटमदऱ्याचा हा परिसर एक अभुतपुर्व नजरा आहे असे दर्शणासाठी आलेले भाविक सांगतात.
यावेळी सकाळी सामुहिक संकल्प व गणेश पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर श्री दत्त पादुका अभिषेक संपन्न झाला. यावेळी सर्व भाविक-भक्तांच्या उपस्थितीत महाअरती घेण्यात आली. त्यानंतर पद्माकर जोशी यांनी दत्तात्रयाच्या मंत्राचे मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थीतांचा व देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाश तेंडूलकर यांची भजन संपन्न झाले. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन साई जनसेवा संस्था, श्री स्वामी सर्मथ परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते.
या ठिकाणी असलेल्या श्री स्वामीदत्त आबाल वृध्दाश्रमात चार अनाथ मुले आणि सहा वृद्ध महिला सध्या राहत असून; संस्थेचे अध्यक्ष रमेश नारायण गायकवाड यांचे वडील, नारायण गायकवाड यांनी दहा गुंठे जागा या श्री स्वामी दत्त आबाल वृध्दाश्रमासाठी व श्री दत्त मंदिरासाठी देणगी स्वरूपात दिली आहे. या आबाल वृद्धाश्रमातील बालक आणि वृद्धांसाठी सेंद्रिय शेती करून अन्न पिकवले जाते. येथे अन्नछत्राची उभारणी करण्यात आली असून ८०×३० चा संपुर्ण परिसर असुन ७०० ते ८०० लोकांची क्षमता असणारे सभागृह आहे.
पुणे येथील राजेंद धस यांच्याकडुन श्री स्वामीदत्त आबाल वृद्धाश्रमास लाकडी तेलघाणा भेट देण्यात आला असुन त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. आदिवासी भागातील आत्यंत दुर्बल अशा कुटुंबात दिपावली साजरी व्हावी म्हणून संस्था दरवर्षी वाडी वस्तीवर जाऊन प्रत्येक कुटूंबाला कपडे, गृहउपयोगी वस्तु, खेळणी व फराळ वाटप तसेच अनेक शाळांना शालेय साहित्याचे करत असते. थंडीत बेघर व गोर-गरिब कुटुंबांना ब्लँकेट व चादरचे वाटप केले जाते. असे नवनविन उपक्रम सातत्याने संस्था दरवर्षी राबवत असुन दानशुर व्यक्तीनी या समाजकार्यास सहकार्य करावे असे अवाहन नारायण गायकवाड यांनी केले आहे.