Skip to main content

ख्वाजा गरीब नवाज आरोग्य शिबिराचा आदर्श सर्वांनी घ्यावा - आमदार अतुल बेनके.

समर्थ भारत वृत्तसेवा

आळेफाटा, ता. ३०: संकल्प, उम्मत की खिदमत, हाजी नजीर चॅरिटेबल ट्रस्ट आणि डॉ. कथे डायग्नोस्टिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानमंदिर हायस्कूल आळे येथे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय हजरत ख्वाजा गरीब नवाज आरोग्य शिबिराचे उद्घाटक म्हणून आमदार अतुल बेनके बोलत होते. आठशे वर्षांपूर्वी मानवतेची शिकवण देत संपूर्ण भारतभर सुफी तत्त्वज्ञानाचा प्रसार करणारे थोर सुफी संत हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या नावाने जुन्नर तालुक्यातील मुस्लिम समाजाने मानवतेचा विशाल दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून घेतलेले हे आरोग्य शिबिर इतरांसाठी आदर्श असे आहेअसे मनोगत जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केले.

यावेळी आळे गावचे सरपंच प्रीतम काळे, उपसरपंच विजय कुराडे, ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे उपाध्यक्ष उल्हास सहाने, प्रा. संजय वाकचौरे शिबिराचे मुख्य संयोजक हाजी गुलामनबी शेख, हाजी शफी मोमीन, मेहबूब काझी, सादिक आतार, हाजी रज्जाक कुरेशी, हाजी इस्माईल खान, रईस चौगुले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.              

दोन हजार जणांची मोफत तपासणी 

या शिबिरामध्ये सर्व रोग निदान अंतर्गत हृदयरोग, अस्थिरोग, कर्करोग, स्त्रीरोग, बालरोग, नेत्र तपासणी, दंतचिकित्सा, त्वचारोग तपासणी, ई.सी.जी.रक्त शर्करा  तपासणी मोफत करण्यात आली. रुग्णांना यावेळी मोफत औषध वाटपही करण्यात आले. जुन्नर तालुका परिसरातील सुमारे दोन हजार नागरिक, युवक, विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले होते. शिबिरामध्ये आढळून आलेले विविध शस्त्रक्रिया आवश्यक असणाऱ्या रुग्णांसाठी शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत तसेच नेत्रविकारासंबंधी डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनच्या वतीने आणि काही शस्त्रक्रिया लोकसहभागातून केल्या जाणार असल्याची माहिती  शिबिराचे प्रमुख संयोजक हाजी गुलामनबी शेख आणि हाजी शफी मोमीन यांनी सांगितले.            

विविध हॉस्पिटल्स आणि डॉक्टरांचा सहभाग 

शिबिरामध्ये लोकमान्य हॉस्पिटल पिंपरी चिंचवड, ओम चैतन्य हॉस्पिटल आळेफाटा, ओरा स्कीन क्लिनिक आळेफाटा, विघ्नहर हॉस्पिटल नारायणगाव, डॉ. मते हॉस्पिटल नारायणगाव, स्पंदन हॉस्पिटल आळेफाटा, इनामदार हॉस्पिटल जुन्नर, डॉ. शैख डेंटल हॉस्पिटल यांनी सहभाग घेतला होता.              

शिबिराची सुरुवात सामुहिक दुवा पठणाने झाली. याप्रसंगी मुफ्ती शमशुद्दीन कादरी, मौलाना हाफिज रेहान, मौलाना मुजीरुद्दीन, मौलाना कारी इमामुद्दीन, मौलाना शहबाज, हाफिज नजीर, हाफिज तजम्मुल साहेब इत्यादी धर्मगुरू उपस्थित होते. शिबिरादरम्यान लंडन येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ मायकल वॉर्न, प्रसिद्ध सर्पदंश तज्ञ डॉ. सदानंद राऊत, श्याम पांडे, नरेंद्र तांबोळी, नेताजी डोके, वल्लभ शेळके, माऊली शेळके आदींनी भेट देऊन संयोजकांचे कौतुक केले.             

शिबिर यशस्वी होण्यासाठी मोबीन शेख, वाजिद इनामदार, शाकीर चौगुले, मुस्तफा शेख, जुबेर शेख, नजीर चौगुले, सिद्दिक ईनामदार, जिलानी पटेल, रशीद मणियार, राजू जमादार, हाजी बशीर मोमीन, हाजी कदीर मोमीन, इरफान काझी, जुबेर इनामदार, युनूस मनियार सर, इमरान मणियार, इम्तियाज मोमीन, रईस मणियार, जावेद मोमीन, इत्यादींनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेहबूब काझी व युनूस मानियार यांनी केले व आभार मोबीन शेख यांनी मानले.

 

पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...

लाखणगाव, पोंदेवाडी गावच्या हद्दीतून वाहने व इतर साहित्यांची चोरी

समर्थ भारत वृत्तसेवा: लाखणगाव पोंदेवाडी गावच्या हद्दीतून टेम्पो, बुलेट, स्प्लेंडर, व इतर साहित्य मिळून २ लाख ३१ हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि. २६/१/२०२४ ते २७/१/२०२४ चे दरम्यान घडली असून या बाबत अन्सार गफुर चौघुले रा. लाखनगाव ता. आंबेगाव यांनी पारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अन्सार चौगुले यांचा शेती व वखार व्यवसाय असून त्यांनी वखार व्यवसायासाठी पाच वर्षांपूर्वी एम. एच ०४ एस १३४८ टाटा कंपनीचा टेम्पो, तीन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १२ एम. टी २५४१ बुलेट गाडी, दोन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १४ एच.एक्स ५११९ स्प्लेंडर मोटरसायकल हि वाहने आहेत. फिर्यादी यांनी पोंदेवाडी गावच्या हद्दीत रोडेवाडी फाटा येथे वखारीचे साहित्य, टेम्पो, दुचाकी व इतर साहित्य ठेवण्यासाठी कंपाउंड तयार केले असून ओपन शेडमध्ये वखार तयार केली आहे. दिनांक २६ रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या गाड्या शेडमध्ये ठेवल्या होत्या रात्री दहा वाजता शेताला पाणी भरून ते ओपन शेड व वखारीचे शेडला कुलुप लावून तेथेच एका रूम मध्ये झोपले होते. दि. २७ रोजी...