समर्थ भारत वृत्तसेवा
लोणी धामणी, ता. २८: धामणी (ता. आंबेगाव ) येथील शिवाजी विद्यालयात माता पालक संघ मेळावा तसेच तिळगुळ, हळदीकुंकू समारंभ पार पडला.या कार्यक्रमात धामणी, पहाडदरा, शिरदाळे, ज्ञानेश्वरवस्ती या जवळपास तीस बचत गटांच्या महिलांनी शिवाजी विद्यालयाला प्रत्येकी शंभर रु प्रमाणे मदत करणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्षपदी विद्यालयाचे प्राचार्य डी.आर.गायकवाड होते या वेळी विद्यार्थिनीच्या आरोग्य विषयी, हिंदू संस्कृती, तिळगुळ, हळदीकुंकू संभारंभ आदी विषयी मार्गदर्शन करण्यात आले. लोकनियुक्त सरपंच रेशमा बोऱ्हाडे यांनी धामणीतील जिजाऊ ग्राम संघातील महिला बचत गट व शिवशक्ती महिला बचत गटातील सदस्यांना प्रत्येकी शंभर रुपये याप्रमाणे विद्यालयास देणगी देण्याचे आवाहन केले सर्व महिला बचत गटातील सदस्यांनी या आवाहनास प्रतिसाद दिला.या बचत गटातर्फे जमा होणारी रक्कम लवकरच विद्यालयास सुपूर्द करण्यात येईल असे आश्वासन सरपंच बोऱ्हाडे यांनी दिले.
या वेळी
मुख्याध्यापक तसेच पी.एम. इमानदार, एस.आर. मनवळ,एस.एल.कोकाटे, सुमती राजगुरू
यांनी विद्यालयाच्या गुणवत्तेचा चढता आलेख व विद्यालयात राबविण्यात येणारे विविध
उपक्रम, एन. एम. एम. एस. स्कॉलरशिप परीक्षेत विद्यालयाने घेतलेली भरारी
याविषयी माहिती दिली. या वेळी गावातील बचत गटाच्या महिला, जि.प. प्राथमिक शाळेच्या
मुख्यध्यापिका अनुराधा कथले तसेच विद्यालयातील सर्व सेवक वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इनामदार यांनी केले आभार कोकाटे यांनी मानले