समर्थ भारत वृत्तसेवा
घोडेगाव, ता. ३०: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी हे श्री क्षेत्र भीमाशंकर येथुन परतत असतना घोडेगाव (ता.आंबेगाव) येथील अहिल्याबाई होळकर चौकात फटाक्याची अतिषबाजी करत घोडेगावमध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर महिलांनी औक्षण करून स्वागत केले.
यावेळी आंबेगाव
तालुका भाजपाचे उपाध्यक्ष तसेच ढाकाळे गावच्या उपसरपंच ज्योती काळे यांनी आपल्या
चिमुकल्यासह संभाजी भिडेंचे आशीर्वाद घेतले. येथील अहिल्यादेवी होळकर मातेच्या
मंदीरात त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी तुकाराम काळे मिलिंद काळे, निलम गावडे, दशरथ काळे, युवा उद्योजक जयेश
काळे, गणेश काळे, कांचन काळोखे स्थानिक नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.