समर्थ भारत वृत्तसेवा
आळेफाटा, ता. २८: कादंबरी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने २७ जानेवारी रोजी हळदीकुंकू समारंभ व नवीन पतसंस्थेचा काउंटर उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभाच्या दरम्यान २५० महिला उपस्थित होत्या. तसेच २०० पुरुष उपस्थित होते. या समारंभाच्या दरम्यान संस्थेच्या अध्यक्षा सारिका दिनेश आग्रे व संस्थेच्या इतर संचालिका यांनी सर्व महिलांचे उत्साहात स्वागत केले. नवीन काउंटर उद्घाटन समारंभासाठी जिल्हा परिषद सदस्य नयना नेताजी डोके व सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत पतसंस्थेच्या नवीन काउंटरचे उद्घाटन पार पाडले.
हळदीकुंकू कार्यक्रम समारंभाच्या दरम्यान लकी ड्रॉ चे आयोजन केले
होते. लकी ड्रॉ कूपन साठी पाच पैठणी बक्षीस म्हणून ठेवण्यात आले होते. लकीड्रॉ
ओपनचे वितरण आमदार निलेश लंके यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषद सदस्य राणी लंके
यांच्या उपस्थितीमध्ये पाच पैठणी साड्या लकीड्रॉ चे वितरण करण्यात आले. तसेच
उद्घाटन व हळदीकुंकू समारंभ संपन्न झाल्यानंतर सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजन
आयोजित केले होते. या समारंभ दरम्यान उपस्थित मान्यवरांचे' संस्थेच्या अध्यक्ष सारिका दिनेश आग्रे व सर्व संचालिकानी आभार
मानले. संस्थेचे मुख्य कार्यालय स्वामी सदन कॉम्प्लेक्स आळेफाटा चौक या ठिकाणी
असून साईलीला मंगल कार्यालय शेजारी नाशिक रोड साई सदन कॉम्प्लेक्स या ठिकाणी नवीन काउंटरचे उद्घाटन करण्यात
आले.