Skip to main content

विद्यार्थ्यांनी अनुभवला जुन्नरचा हजारो वर्षापूर्वीचा इतिहास.

समर्थ भारत वृत्तसेवा

बेल्हे, ता. २९: समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल बेल्हे (बांगरवाडी) या सी बी एस इ इंग्लिश मेडिअम स्कूलच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवनेरी किल्ला, अंबा अंबालिका लेणी, नाणेघाट, कुकडेश्वर मंदिर या ठिकाणी नुकतेच करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना प्रसिद्ध लेणी अभ्यासक सिद्धार्थ कसबे यांनी मार्गदर्शन केले. 

शिवनेरी किल्ला 

शिवनेरी किल्ल्यावर पोहचल्यानंतर महादरवाजा पासून ते सर्व सात दरवाजे; त्यावर असलेल्या शरभ शिल्प, दरवाजांची रचना, बांधकाम शैली, त्यांचा इतिहास याबाबत विस्तृत माहिती सांगितली. पुढे शिवाई देवीचे मूळ मंदिर त्यामागील इतिहास व तेथे कोरलेली लेणी यांची माहिती दिली. अंबरखाना, जन्मस्थळ, त्या ठिकाणी असलेली त्याकाळची खापराची पाईप लाईन, कारंजे, बदामी तलाव, त्यातील दगडांचा वापर कुठे केला या संदर्भातील सर्व माहिती विद्यार्थ्यांना दिली.

लेण्या आणि प्राचीन मंदिर

अंबा अंबालिका लेणी, भूत लेणी, भीमाशंकर लेणी यांचा असलेला दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास व त्याबद्द्लची माहिती सांगितली. विशेष म्हणजे एकाच दिवसामध्ये विद्यार्थी प्राचीन धम्मलिपीची अक्षरे ओळखायला व वाचायला शिकली. त्यानंतर नाणेघाट येथे गेल्यावर नाणेघाटाच्या निर्मितीचा इतिहास, तेथील रांजण, लेणी, लेण्यांमध्ये कोरलेल्या प्राकृत भाषा व धम्म लिपीचे वाचन करून माहिती दिली. नाणेघाटाच्या कड्यावरून मुलांनी सुर्यास्त होतानाच्या दृश्याचा आनंद घेतला. शेवटी एक हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असलेल्या हेमांडपंथी कुकडेश्वर मंदिराची व परिसराची माहिती दिली.

संगीत शिक्षक राहुल दुधवडे यांनी शिवरायांच्या चरित्र्यावर आधारित  गीते व पोवाडे सदर करून विद्यार्थ्यांमध्ये स्फूर्ती निर्माण केली. इतिहासाच्या अभ्यासाबरोबर जुन्नरचे नैसर्गिक वैभव विद्यार्थ्यांनी अनुभवले. या शैक्षणिक सहलीचे आयोजन संस्थेचे सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

 

पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

मराठा समाज्याच्या वतीने रस्ता रोको

समर्थ भारत वृत्तसेवा : लाखनगाव, विजय कानसकर, आंबेगाव तालुक्यातील रोडेवाडी फाटा ( पोंदेवाडी ) 18 फेब्रुवारी रोजी सकल मराठा बांधव आणि महिलांच्या वतीने बेल्हा जेजुरी, अष्टविनायक मुख्य महामार्गावर ट्रक आडवा लावला. या आंदोलनाची प्रमुख मागणी होती जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्या व तात्काळ मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा, तसेच राज्यातील जे मराठा  आमदार, खासदार आहेत त्यांनी जरांगे पाटील यांच्या  पाठीशी खंबीरपणे उभे राहत मराठा आरक्षणाला जाहीर  पाठिंबा द्यावा. यासारख्या विविध मागण्या घेऊन मराठा  आंदोलकांनी हे आंदोलन रोडेवाडी फाटा ( पोंदेवाडी ) येथे केले आहे, याप्रसंगी प्रशासनाच्या वतीने आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत महामार्ग सुरळीत सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, अष्टविनायक तसेच बेल्हा जेजुरी या मुख्य महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आता शासन जरांगे पाटील यांच्या अटी पूर्ण करणार का पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको मराठा आंदोलनकर्ते करणार का? कारण जरांगे पाटील यांच...

लाखणगाव, पोंदेवाडी गावच्या हद्दीतून वाहने व इतर साहित्यांची चोरी

समर्थ भारत वृत्तसेवा: लाखणगाव पोंदेवाडी गावच्या हद्दीतून टेम्पो, बुलेट, स्प्लेंडर, व इतर साहित्य मिळून २ लाख ३१ हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि. २६/१/२०२४ ते २७/१/२०२४ चे दरम्यान घडली असून या बाबत अन्सार गफुर चौघुले रा. लाखनगाव ता. आंबेगाव यांनी पारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अन्सार चौगुले यांचा शेती व वखार व्यवसाय असून त्यांनी वखार व्यवसायासाठी पाच वर्षांपूर्वी एम. एच ०४ एस १३४८ टाटा कंपनीचा टेम्पो, तीन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १२ एम. टी २५४१ बुलेट गाडी, दोन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १४ एच.एक्स ५११९ स्प्लेंडर मोटरसायकल हि वाहने आहेत. फिर्यादी यांनी पोंदेवाडी गावच्या हद्दीत रोडेवाडी फाटा येथे वखारीचे साहित्य, टेम्पो, दुचाकी व इतर साहित्य ठेवण्यासाठी कंपाउंड तयार केले असून ओपन शेडमध्ये वखार तयार केली आहे. दिनांक २६ रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या गाड्या शेडमध्ये ठेवल्या होत्या रात्री दहा वाजता शेताला पाणी भरून ते ओपन शेड व वखारीचे शेडला कुलुप लावून तेथेच एका रूम मध्ये झोपले होते. दि. २७ रोजी...