पुणे प्रतिनिधी :
जेवायला न दिल्याने रिक्षाचालकाने पत्नीला बेदम मारहाण करुन तिचा खून
केल्याची घटना बिबवेवाडी भागातील इंदिरानगर परिसरात घडली. सविता संदीप ओैचिते (वय.३२ वर्ष) रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी असे खून
झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती परशुराम उदडंप्पा जोगन (वय.३८ वर्ष)
याला अटक करण्यात आली आहे.
गणेश दत्तात्रय शिंदे (वय ३३,
रा. लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी) याने या संदर्भात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी जोगन हा शिंदे याच्या रिक्षावर चालक आहे. रिक्षाचालक जोगन याची सविता ओैचिते
दुसरी पत्नी आहे. मध्यरात्री जोगन घरी गेला होता. त्या वेळी त्याने जेवायला
मागितले. तिने जेवण न दिल्याने जोगनने तिला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सविताचा मृत्यू झाला. पसार झालेल्या जोगनला
पोलिसांनी अटक केली. पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर तपास करत आहेत.