समर्थ भारत वृत्तसेवा
लोणी धामणी, ता. २९: धामणी (ता.आंबेगाव) येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री शिवाजी विद्यालय व जुनिअर कॉलेज मधील सन १९९२-९३ दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने रुपये एक लाख ८५ हजार रु खर्च करून नूतनीकरण केलेल्या सांस्कृतिक सभागृहाचे तसेच विद्यार्थ्यांना व्यायामासाठी लागणाऱ्या डबल व सिंगल बार, क्रीडा साहित्य प्रदान कार्यक्रमाचे उदघाट्न प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर एस.एस.सी. बॅच १९९२-९३ माजी विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
१४ ऑगस्ट २०२२ ला माजी विद्यार्थी मेळावा विद्यालयात पार पडला. या मेळाव्यात सर्वानुमते विद्यालयाचा सांस्कृतिक हॉल डिजिटल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार हॉल चे काम पूर्ण करण्यात आले असून माजी विद्यार्थी प्रवीण जाधव यांनी दहा हजार रुपये किमतीचे डबल बार, सिंगल बार व क्रीडा साहित्य विद्यालयास प्रदान केले. या वेळी दहावी बॅचच्या आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या नवीन इमारत बांधणीसाठी १ लाख ५१ हजार रुपयाची देणगी शाळेला दिली जाईल असे आश्वासन दिले असून माजी विद्यार्थ्यांनी शाळेला दिलेल्या भरीव देणगीबद्दल त्यांचे सर्व स्तरावर कौतुक केले जात आहे.
कार्यक्रमाचे
नियोजन डॉ. प्रा. काळुराम विधाटे,
प्रविण जाधव, विष्णु विधाटे, ज्ञानेश्वर विधाटे, संदीप बढेकर, समीर नेवसे, रमेश वाघ, मंगेश जाधव यांनी
केले. या वेळी कार्यक्रमास राजेंद्र पंचरास, राजेंद्र वीर, सुनीता भुजबळ, उज्ज्वला विधाटे, हुसेन पठाण, संतोष ढोबळे, रवी गोरडे, अनिल शिंदे, संतोष मांदळे, संतोष शेळके, रामहरी पिंगळे आदी
माजी विद्यार्थी; तसेच शाळेचे मुख्याध्यापक डी. आर गायकवाड, माजी विद्यार्थिनी
परवीन इनामदार, सर्व सेवकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विधाटे
यांनी केले व आभार प्राचार्य गायकवाड यांनी मानले.