समर्थ भारत वृत्तसेवा
घोडेगाव, ता. २८: घोडेगाव येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी. काळे महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्ताने नुकतेच कोपरगाव येथील डॉ. वैशाली सुपेकर यांचे सोहळा लोकशाहीचा जागर मताधिकाराचा या विषयावर ऑनलाईन व्याख्यान संपन्न झाले.
सुरुवातीला महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी मतदार दिनानिमित्त मतदानाची शपथ घेतली. भारतामधील मतदारांनी निर्भयपणे, निपक्षपातीपणे लोकशाहीने दिलेल्या मतदान अधिकाराचा वापर करावा. तरुणांनी बहुसंख्येने मिळून लोकशाही प्रणालीमध्ये आपल्या मताधिकाराचा वापर करून लोकशाही बळकट करावी; असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ.
ज्ञानेश्वर वाल्हेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या व्याख्यानासाठी मानसशास्त्र
या विषयाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. प्रीतमकुमार बेडरकर (अहमदनगर कॉलेज) तसेच
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब गव्हाळे, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. प्रभाकर मोकळ, इतिहास विभागप्रमुख
डॉ. नाथा मोकाटे, भूगोल विभागप्रमुख डॉ. गुलाबराव पारखे, इंग्रजी
विभागप्रमुख डॉ. वल्लभ करंदीकर,
विद्यार्थी कल्याण अधिकारी कैलास
उंबरे, डॉ. माणिक बोराडे,
डॉ. चांगुणा कदम, पोपट माने आदि ऑनलाईन
व्याख्यानासाठी उपस्थित होते. प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागाचे समन्वयक सुनील
नेवकर यांनी केले.सचिन घायतडके यांनी आभार मानले. ऑनलाइन व्याख्यानासाठी
महाविद्यालयातील ५० विद्यार्थी उपस्थित होते.