समर्थ भारत वृत्तसेवा
शिक्रापूर, त. २८: सणसवाडी ता. शिरुर येथील भारत गॅस रोड लगत एका
ठिकाणी ओढ्याचे कडेला सुरु असलेल्या गावठी दारु भट्टीवर शिक्रापूर पोलिसांच्या
पथकाने छापा टाकून गावठी दारु बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करत अनिता अंकुश
नानावत या महिलेवर गुन्हे दाखल केले आहे.
सणसवाडी
ता. शिरुर येथील भारत गॅस रोड लगत ओढ्याचे कडेला एक महिला गावठी दारु तयार करत
असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली, त्यांनतर पोलीस हवालदार अमोल दांडगे, पोलीस नाईक विकास पाटील, जयराज देवकर, महिला पोलीस नाईक अपेक्षा टाव्हरे यांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता
त्यांना एक महिला काही रसायन मिश्रित करुन गावठी दारु तयार करताना दिसून आली,
मात्र पोलीस आल्याची चाहूल लागताच महिला काटेरी झुडपातून पळून गेली,
यावेळी पोलिसांनी सदर ठिकाणहून काही गावठी दारु व साहित्य असा सुमारे
आठ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला असून याबाबत महिला पोलीस नाईक अपेक्षा बाजीराव
टाव्हरे रा. शिक्रापूर शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन
येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अनिता अंकुश नानावत रा. सणसवाडी
ता. शिरुर जि. पुणे या महिलेविरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस
निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रवीकिरण जाधव हे
करत आहे.