समर्थ भारत वृत्तसेवा
टाकळी हाजी, ता. ३०: सविंदणे ता. शिरूर येथिल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शुभांगी पडवळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी सरपंच सोनाली खैरे यांनी राजीनामा दिल्यानंतर सरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी शुभांगी पडवळ यांचा सरपंचपदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीनंतर ग्रामस्थांच्या वतीने नुतन सरपंच शुभांगी पडवळ यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, भिमाशंकर सह. कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी नवनिर्वाचित सरपंच यांचे अभिनंदन केले आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाळासाहेब भोर यांनी केले तर आभार भोलेनाथ पडवळ यांनी मानले. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन मंडल आधिकारी माधुरी बागले, तलाठी आबासाहेब मोरे, ग्रामसेवक हनुमंत चव्हाण यांनी काम पाहीले.
यावेळी माजी सरपंच
सोनाली खैरे, उपसरपंच भाऊसाहेब लंघे, ग्रामपंचायत सदस्या मनीषा नरवडे, रेखा भोर, नंदा पुंडे, मालूबाई मिंडे, भोलेनाथ पडवळ, रवींद्र पडवळ, ईश्वर पडवळ, गोरक्ष लंघे व
पॅनलप्रमुख उद्योजक, माजी सरपंच वसंतशेठ पडवळ, बाळासाहेब भोर, सचिन खैरे, चेअरमन रामदास पडवळ, भरत पडवळ, बाळासाहेब पडवळ, बारकू भापकर, मोहन किठे, दत्ता नरवडे, मयूर कोळेकर, गणेश कोळेकर, जयदिप लंघे व
ग्रामस्थ मोठया संख्येने हजर होते.