Skip to main content

Posts

Showing posts from January, 2023

पतीची आत्महत्या नसून घातपाताचा संशय; पत्नीची सासरच्या लोकांनी तोंडाला काळ फासून काढली धिंड.

समर्थ भारत वृत्तसेवा: नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील शिवरे गावात पतीच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करणाऱ्या पत्नीची नातेवाईकांनी तोंडाला काळं फासून धिंड काढल्याचा प्रकार घडला आहे.या संबंधी पिडीत महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. याबद्दल अधिक माहिती अशी की, शिवरे गावातील एका महिलेच्या पतीने आत्महत्या करत जीवन संपवलं. यावेळी त्याची पत्नी माहेरी होती. पत्नीने पतीची आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली. यामुळं तिच्या सासरच्या नातेवाईकांनी राग मनात ठेवून पतीच्या नातेवाईकांनी महिलेच्या तोंडाला काळे फासून चपलांचा हार घालत गावात धिंड काढल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेच्या गाडीचा अपघात काही दिवसांपूर्वी झाला होता. अपघातात तिच्या हाताला दुखापत झाली असल्याने तिच्या पतीने तिला माहेरी सोडले होते. त्यानंतर काही दिवसांनी पतीने आत्महत्या केल्याची बातमी पीडित महिलेला समजली. संबंधित महिला पतीच्या दशक्रिया विधीसाठी महिला गावात पोहचली होती , मात्र पतीच्या नातेवाइकांनी तिला मारहाण केली. पत्नीनं...

रिक्षाचालकाने पत्नीला केलेल्या मारहाणीत पत्नीचा खून.

पुणे प्रतिनिधी   : जेवायला न दिल्याने रिक्षाचालकाने पत्नीला बेदम मारहाण करुन तिचा खून केल्याची घटना बिबवेवाडी भागातील इंदिरानगर परिसरात घडली. सविता संदीप ओैचिते (वय.३२ वर्ष) रा. अप्पर इंदिरानगर , बिबवेवाडी असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती परशुराम उदडंप्पा जोगन (वय.३८ वर्ष) याला अटक करण्यात आली आहे. गणेश दत्तात्रय शिंदे (वय ३३ , रा. लोअर इंदिरानगर , बिबवेवाडी) याने या संदर्भात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी जोगन हा शिंदे याच्या रिक्षावर चालक आहे. रिक्षाचालक जोगन याची सविता ओैचिते दुसरी पत्नी आहे. मध्यरात्री जोगन घरी गेला होता. त्या वेळी त्याने जेवायला मागितले. तिने जेवण न दिल्याने जोगनने तिला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सविताचा मृत्यू झाला. पसार झालेल्या जोगनला पोलिसांनी अटक केली. पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर तपास करत आहेत.

सविंदणे गावच्या सरपंचपदी शुभांगी विठ्ठल पडवळ.

समर्थ भारत वृत्तसेवा टाकळी हाजी , ता. ३०:   सविंदणे   ता. शिरूर येथिल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शुभांगी पडवळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी सरपंच सोनाली खैरे यांनी राजीनामा दिल्यानंतर सरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी   शुभांगी पडवळ यांचा सरपंचपदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीनंतर ग्रामस्थांच्या   वतीने नुतन सरपंच शुभांगी पडवळ यांचा नागरी सत्कार करण्यात आला.    माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील , माजी आमदार पोपटराव गावडे , भिमाशंकर सह. कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी नवनिर्वाचित सरपंच यांचे अभिनंदन केले आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाळासाहेब भोर यांनी केले तर आभार भोलेनाथ पडवळ यांनी मानले. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन मंडल आधिकारी माधुरी बागले , तलाठी आबासाहेब मोरे , ग्रामसेवक हनुमंत चव्हाण यांनी काम पाहीले.   यावेळी माजी सरपंच सोनाली खैरे , उपसरपंच भाऊसाहेब लंघे , ग्रामपंचायत सदस्या मनीषा नरवडे , रेखा भोर , नंदा पुंडे , मालूबाई मिंडे , भोलेनाथ पडवळ , रवींद्र पडवळ , ईश्...

ख्वाजा गरीब नवाज आरोग्य शिबिराचा आदर्श सर्वांनी घ्यावा - आमदार अतुल बेनके.

समर्थ भारत वृत्तसेवा आळेफाटा , ता. ३०:   संकल्प , उम्मत की खिदमत , हाजी नजीर चॅरिटेबल ट्रस्ट आणि डॉ. कथे डायग्नोस्टिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानमंदिर हायस्कूल आळे येथे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय हजरत ख्वाजा गरीब नवाज आरोग्य शिबिराचे उद्घाटक म्हणून आमदार अतुल बेनके बोलत होते.   आठशे वर्षांपूर्वी मानवतेची शिकवण देत संपूर्ण भारतभर सुफी तत्त्वज्ञानाचा प्रसार करणारे थोर सुफी संत हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या नावाने जुन्नर तालुक्यातील मुस्लिम समाजाने मानवतेचा विशाल दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून घेतलेले हे आरोग्य शिबिर इतरांसाठी आदर्श असे आहे ;  असे मनोगत जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केले. यावेळी आळे गावचे सरपंच प्रीतम काळे , उपसरपंच विजय कुराडे , ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे उपाध्यक्ष उल्हास सहाने , प्रा. संजय वाकचौरे शिबिराचे मुख्य संयोजक हाजी गुलामनबी शेख , हाजी शफी मोमीन , मेहबूब काझी , सादिक आतार , हाजी रज्जाक कुरेशी , हाजी इस्माईल खान , रईस चौगुले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.                दोन ह...

अज्ञात चोरट्यांनी चोरल्या कालव्यावरच्या मोटारी.

समर्थ भारत वृत्तसेवा बेल्हे , ता. ३०:   येथील बांगरवाडी गावाच्या सीमेवरुन वाहणारा पिंपळगाव जोगा कालवा जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरला असून शेतक-यांचे बागायतदार होण्याचे स्वप्न साकार होताना दिसून येत आहे. परंतु हे होत असताना या महिन्यात विहिरींचे पाणी कमी झाल्याने शेतक-यांनी आपल्या मोटारी उचलपाण्यासाठी कालव्यावर ठेवल्या ख-या पण त्या मोटारीवर चोरट्यांची नजर गेली व रविवारी(दि.२९) रात्री ७.५ अश्वशक्तिच्या व अंदाजे दोन लाख रुपयांच्या ६ मोटारी केबल व स्टार्टरसह अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची माहिती बेल्हे शिवसेना शाखाप्रमुख राजेंद्र गफले यांनी दिली. सोमवारी (दि.३०) सकाळी दिवसा वीजपुरवठा असल्याने गफले आपली मोटार चालू करण्यासाठी कालव्यावर गेले असता त्यांची मोटारचे पाईप कापून मोटार नेल्याचे दिसून आले व अधिक तपास केला असता बांगरवाडीचे माजी सरपंच पांडूरंग शिरतर , गोविंद बिचारे , नामदेव बांगर , संजय बांगर यांच्याही मोटारींची चोरी झाल्याचे दिसून आले. यापूर्वीही असे प्रकार झाले असून त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. संजय बांगर यांची मोटार दुस-यांदा चोरीला गेल्याने सु...

ग्रामस्थांच्या सहभागातून जुन्या मंदिरांचा जिर्णोध्दार.

समर्थ भारत वृत्तसेवा बेल्हे , ता. ३०:   गावातील जागृत स्वयंभू असलेली देवस्थाने श्री नागेश्‍वर व पोळेश्‍वर ही दोन्ही   मंदिरे भव्यदिव्य आणि देखण्या स्वरूपात बांधण्यात आली असून या मंदिराचा जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा गुरुवार व शुक्रवार (दि.२/३ फेब्रुवारी) रोजी विविध धार्मिक , सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रदिप पिंगट यांनी दिली.   श्री नागेश्‍वर   व पोळेश्‍वर या दोन्ही मंदिराचा नुकताच ग्रामस्थांच्यावतीने जीर्णोद्धार करण्यात आला असून सुंदर व   देखणी अशी मंदिरे ग्रामस्थांच्या वतीने उभारण्यात आली असून या मंदिरांच्या जीर्णोद्धार सोहळ्याच्या निमित्ताने गुरुवार (दि.२) रोजी नवीन मूर्तींची मिरवणूक , होमहवन व अभिषेक तर शुक्रवार   ( दि.३) रोजी हभप सुदाममहाराज बनकर यांच्या हस्ते नवीन मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असून त्यानंतर जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ येथे हभप समाधानमहाराज शर्मा यांचे किर्तन व समस्त ग्रामस्थ बेल्हे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा   पार पाडण्यासाठी...

श्री दत्त मंदिराचा तृतीय वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न.

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव , ता. ३०:   कोटमदरा ता.आंबेगाव येथे , दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही , नयन मनोहर श्री दत्त मंदिराचा तृतीय वर्धापन दिन सोहळा मोठया उत्साहात व भक्तीभावाने संपन्न झाला. डोंगराच्या कुशीत वसलेल्या कोटमदऱ्याचा हा परिसर एक अभुतपुर्व नजरा आहे असे दर्शणासाठी आलेले भाविक सांगतात.               यावेळी सकाळी सामुहिक संकल्प व गणेश पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर श्री दत्त पादुका अभिषेक संपन्न झाला. यावेळी सर्व भाविक-भक्तांच्या उपस्थितीत महाअरती घेण्यात आली. त्यानंतर पद्माकर जोशी यांनी दत्तात्रयाच्या मंत्राचे मार्गदर्शन केले.   यावेळी   उपस्थीतांचा व देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाश तेंडूलकर यांची भजन संपन्न झाले. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन साई जनसेवा संस्था , श्री स्वामी सर्मथ परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते.       या ठिकाणी असलेल्या श्री स्वामीदत्त आबाल वृध्दाश्रमात चार अनाथ मुले आणि सहा वृद्ध महिला सध्या राहत असून ; संस्थेचे अध्यक्ष रमेश नारायण गायकवाड यांचे वड...

संभाजी भिडे यांचे घोडेगावमध्ये स्वागत.

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव , ता. ३०:   शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी हे श्री क्षेत्र भीमाशंकर येथुन परतत असतना घोडेगाव (ता.आंबेगाव) येथील अहिल्याबाई होळकर चौकात फटाक्याची अतिषबाजी करत   घोडेगावमध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर महिलांनी औक्षण करून स्वागत केले. यावेळी आंबेगाव तालुका भाजपाचे उपाध्यक्ष तसेच ढाकाळे गावच्या उपसरपंच ज्योती काळे यांनी आपल्या चिमुकल्यासह संभाजी भिडेंचे आशीर्वाद घेतले. येथील अहिल्यादेवी होळकर मातेच्या मंदीरात त्यांचा सत्कार करण्यात आला.   या प्रसंगी तुकाराम काळे मिलिंद काळे , निलम गावडे , दशरथ काळे , युवा उद्योजक जयेश काळे , गणेश काळे , कांचन काळोखे स्थानिक नागरिक , युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

रांजणगाव MIDC मध्ये माथाडीच्या नावाखाली चाललीये लुट : अरे ड्रायव्हर भाऊ जागा हो ऊठ...

समर्थ भारत वृत्तसेवा शिरुर (तेजस फडके) , ता. २९:   आशिया खंडातील पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीत गेल्या अनेक वर्षांपासुन माथाडीच्या नावाखाली बोगस पावत्या फाडून पैसे वसुल केले जात आहेत. परंतु पुणे माथाडी , हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळाचे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक पोलिस प्रशासन याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करत असल्याचे दिसत असुन यामुळे बाहेरच्या राज्यातून रांजणगाव MIDC त माल घेऊन येणाऱ्या वाहनचालकांना कोणीच वाली नसल्याचे चित्र आहे. रांजणगाव MIDC तील झामील स्टील कंपनीचे एच आर मॅनेजर राहुल भागवत यांनी दि 14 ऑगस्ट 2021 रोजी 200 रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी माथाडी कामगार काशिनाथ चंदनराव पाचंगे यांच्यावर रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता. परंतु माझ्यावर कंपनी प्रशासनाने खोटा गुन्हा दाखल करुन अन्याय केला असल्याचे सांगत पाचंगे यांनी या विरोधात मुंबई येथे उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. परंतु सध्या रांजणगाव MIDC त ढोकसांगवी गावच्या हद्दीत असणाऱ्या एक ते दोन कंपनीच्या बाहेर माथाडीच्या बोगस पावत्या फाडल्या जात असताना रांजणगाव MIDC चे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे तसेच ...

विद्यार्थ्यांनी अनुभवला जुन्नरचा हजारो वर्षापूर्वीचा इतिहास.

समर्थ भारत वृत्तसेवा बेल्हे , ता. २९:   समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल बेल्हे (बांगरवाडी) या सी बी एस इ इंग्लिश मेडिअम स्कूलच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवनेरी किल्ला , अंबा अंबालिका लेणी , नाणेघाट , कुकडेश्वर मंदिर या ठिकाणी नुकतेच करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना प्रसिद्ध लेणी अभ्यासक सिद्धार्थ कसबे यांनी मार्गदर्शन केले.   शिवनेरी किल्ला   शिवनेरी किल्ल्यावर पोहचल्यानंतर महादरवाजा पासून ते सर्व सात दरवाजे ; त्यावर असलेल्या शरभ शिल्प , दरवाजांची रचना , बांधकाम शैली , त्यांचा इतिहास याबाबत विस्तृत माहिती सांगितली. पुढे शिवाई देवीचे मूळ मंदिर त्यामागील इतिहास व तेथे कोरलेली लेणी यांची माहिती दिली. अंबरखाना , जन्मस्थळ , त्या ठिकाणी असलेली त्याकाळची खापराची पाईप लाईन , कारंजे , बदामी तलाव , त्यातील दगडांचा वापर कुठे केला या संदर्भातील सर्व माहिती विद्यार्थ्यांना दिली. लेण्या आणि प्राचीन मंदिर अंबा अंबालिका लेणी , भूत लेणी , भीमाशंकर लेणी यांचा असलेला दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास व त्याबद्द्लची मा...

शिवाजी विद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहाचे उदघाटन.

समर्थ भारत वृत्तसेवा लोणी धामणी , ता. २९:   धामणी (ता.आंबेगाव) येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री शिवाजी विद्यालय व जुनिअर कॉलेज मधील सन १९९२-९३ दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने रुपये एक लाख ८५ हजार रु खर्च करून नूतनीकरण केलेल्या सांस्कृतिक सभागृहाचे तसेच विद्यार्थ्यांना व्यायामासाठी लागणाऱ्या डबल व सिंगल बार , क्रीडा साहित्य प्रदान कार्यक्रमाचे उदघाट्न प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर एस.एस.सी. बॅच १९९२-९३ माजी विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. १४ ऑगस्ट २०२२ ला माजी विद्यार्थी मेळावा विद्यालयात पार पडला. या मेळाव्यात सर्वानुमते विद्यालयाचा सांस्कृतिक हॉल डिजिटल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार हॉल चे काम पूर्ण करण्यात आले असून माजी विद्यार्थी प्रवीण जाधव यांनी दहा हजार रुपये किमतीचे डबल बार , सिंगल बार व क्रीडा साहित्य विद्यालयास प्रदान केले.   या वेळी दहावी बॅचच्या आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या नवीन इमारत बांधणीसाठी १ लाख ५१ हजार रुपयाची देणगी शाळेला दिली जाईल असे आश्वासन दिले असून माजी विद्यार्थ्यांनी शाळेला दिलेल्या भरीव   देणगीबद्दल ...

शिरूरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार.

समर्थ भारत वृत्तसेवा टाकळी हाजी ता. २९:   शिरुर शहरात   अस्लम जैनुदिन सय्यड याने   एका अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने वारंवार बलात्कार केल्याने त्या पुरुषावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती शिरूर पोलिस ठाण्याकडून समजली आहे. शिरूर शहरामध्ये ऑक्टोबर २०२२ ते दि. २८ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान वेळोवेळी शिरूर येथील सदनिकेत अस्लम जैनुदिन सय्यद रा. आंबेडकर नगर , लाटेआळी , शिरुर , जि. पुणे. याने एका अल्पवयीन मुलीला सामान घेण्यासाठी बोलावून तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेवून त्या अल्पवयीन मुलीवर   तिच्या इच्छेविरुध्द   लैंगिक अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. याबाबत शिरूर पोलिस स्टेशनमध्ये पोक्सोसह ; अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदयासह इतर गुन्हे दाखल आहे. पुढील   तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी करत आहेत. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला असून त्याला पकङण्यासाठी शिरुर पोलिसांची तीन पथके रवाना केली असून ; त्याला लवकर गजाआड केले जाईल.   ( यशवंत गवारी , पोलिस उपविभागी...

बी.डी. काळे महाविद्यालयात लोकशाहीचा जागर मताधिकाराचा या विषयावर ऑनलाईन व्याख्यान संपन्न.

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव , ता. २८:   घोडेगाव येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी. काळे महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्ताने नुकतेच कोपरगाव येथील डॉ. वैशाली सुपेकर यांचे सोहळा लोकशाहीचा जागर मताधिकाराचा या विषयावर ऑनलाईन व्याख्यान संपन्न झाले.   सुरुवातीला महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी मतदार दिनानिमित्त मतदानाची शपथ घेतली. भारतामधील मतदारांनी निर्भयपणे , निपक्षपातीपणे लोकशाहीने दिलेल्या मतदान अधिकाराचा वापर करावा. तरुणांनी बहुसंख्येने मिळून लोकशाही प्रणालीमध्ये आपल्या मताधिकाराचा वापर करून लोकशाही बळकट करावी ; असे आवाहन त्यांनी केले.   याप्रसंगी   प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर वाल्हेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या व्याख्यानासाठी मानसशास्त्र या विषयाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. प्रीतमकुमार बेडरकर (अहमदनगर कॉलेज) तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब गव्हाळे , वाणिज्य विभागप्रमुख डॉ. प्रभाकर मोकळ , इतिहास विभागप्रमुख डॉ. नाथा मोकाटे , भूगोल विभागप्रमुख डॉ. गुलाबराव पारखे , इंग्रजी विभाग...

कोयत्याची दहशत माजवणाऱ्या अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात.

पुणे प्रतिनिधी: फुटबॉल खेळताना झालेल्या वादातून अल्पवयीन मुलांनी तरुणावर कोयत्याने वार करुन बेदम मारहाण केल्याची घटना येरवडा भागात घडली. अल्पवयीन मुलांनी कोयते उगारुन परिसरात दहशत माजविली. मुलांनी दोन रिक्षांच्या काचा फोडल्या.या प्रकरणी चार अल्पवयीन मुलांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल अमीरउल्ला खान (वय १९ वर्ष) रा. लक्ष्मीनगर , येरवडा याने या संदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुले आणि खान एकाच भागात राहायला आहेत. फुटबॉल खेळताना अल्पवयीन मुले आणि खान यांच्यात वाद झाला होता. खान , त्याचे मित्र , महेश मिश्रा , आयुष दुचाकीवरुन येरवडा भागातून निघाले होते.त्या वेळी अल्पवयीन मुलांनी दुचाकीस्वार खानला अडवले. त्याच्यावर कोयत्याने वार केला. खान याचा मित्र मिश्राला बांबुने मारहाण केली. परिसरात दहशत माजवून दोन रिक्षांच्या काचा फोडल्या. पसार झालेल्या मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

२० वर्षीय युवकाचा विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू.

समर्थ भारत वृत्तसेवा: कोथरुड भागातील तरुणाचा विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना खेड शिवापूर भागात घडली. अभिषेक यशवंत टिळक (वय.२० वर्ष) असे या तरुणाचे नाव आहे. अभिषेक हा दोन महिन्यांपूर्वी भास्कर जगताप यांच्याकडे गाडीचा चालक म्हणून कामाला लागला होता. नेहमीप्रमाणे टेम्पो घेऊन गाडीमध्ये नारळ वृक्षांच्या फांद्या औंधवरून खेड शिवापूरला निघाला होता. यावेळी खेड शिवापूरला भास्कर जगताप यांच्या मालकीच्या जमिनीमध्ये गट क्रमांक ११ मध्ये असलेल्या शेतामध्ये नारळाच्या फांद्या खाली करण्यासाठी टेम्पो अभिषेकने इलेक्ट्रिक पोलच्या तारेखाली उभा केला. अभिषेक टेम्पोत चढला असताना नारळाची फांदी २२ केव्ही वीजप्रवाह असलेल्या तारेला लागली आणि त्याला विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. ही माहिती कळताच नागरिकांनी धाव घेतली. अभिषेक हा आई वडिलांना एकटाच मुलगा होता. त्याच्या पश्चात एक बहीण आहे. या घटनेने अभिषेक याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.    

शिरदाळे येथे विधवा महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करून अनोख्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा.

समर्थ भारत वृत्तसेवा पारगाव , ता. २८:   शिरदाळे ( ता.आंबेगाव ) भारताचा ७४ प्रजासत्ताक दिन   मोठ्या आनंदात उत्साहात आणि अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.   जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ध्वजापूजन   शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष निवृत्ती तांबे , सदस्य दीपाली संदेश तांबे यांच्या हस्ते करण्यात आले.   गावातील शेतकरी शांताराम चौधरी व निवृत्ती मिंडे यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.   शंकर दत्तात्रय तांबे यांच्या सप्तनीक व योगेश मारुती तांबे सप्तनीक तसेच सुनील मनोहर रणपिसे सप्तनीक या मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.   त्यानंतर ग्रामपंचायत प्रांगणात ग्रामपंचायत ध्वजारोहण संपन्न झाले. दरवर्षी गावचे सरपंच , उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते व गावातील पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम घेत असतो परंतु या वर्षी ग्रामपंचायत सरपंच , उपसरपंच तसेच सर्व सदस्य कमिटीने निर्णय घेत हा मान गावातील विधवा महिला , सरकारी सेवेतील मुले व त्यांचे पालक तसेच मा. सैनिक व गुणवंत विद्यार्थी यांना देण्याचे ठरवले होते.    ग्रामपंचायतने...

सणसवाडीत दारुभट्टीवर शिक्रापूर पोलिसांचा छापा.

समर्थ भारत वृत्तसेवा शिक्रापूर , त. २८:   सणसवाडी ता. शिरुर येथील भारत गॅस रोड लगत एका ठिकाणी ओढ्याचे कडेला सुरु असलेल्या गावठी दारु भट्टीवर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून गावठी दारु बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करत अनिता अंकुश नानावत या महिलेवर गुन्हे दाखल केले आहे. सणसवाडी ता. शिरुर येथील भारत गॅस रोड लगत ओढ्याचे कडेला एक महिला गावठी दारु तयार करत असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली , त्यांनतर पोलीस हवालदार अमोल दांडगे , पोलीस नाईक विकास पाटील , जयराज देवकर , महिला पोलीस नाईक अपेक्षा टाव्हरे यांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्यांना एक महिला काही रसायन मिश्रित करुन गावठी दारु तयार करताना दिसून आली , मात्र पोलीस आल्याची चाहूल लागताच महिला काटेरी झुडपातून पळून गेली , यावेळी पोलिसांनी सदर ठिकाणहून काही गावठी दारु व साहित्य असा सुमारे आठ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला असून याबाबत महिला पोलीस नाईक अपेक्षा बाजीराव टाव्हरे रा. शिक्रापूर शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अनिता अंकुश नानावत रा...

शिक्रापुरातून बसने प्रवास करणाऱ्या महिलेचे सहा तोळे लांबविले.

समर्थ भारत वृत्तसेवा शिक्रापूर , ता. २८:   शिक्रापूर ता. शिरुर येथील चौकातून बसने प्रवास करणाऱ्या महिलेचे तब्बल सव्वा सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर ता. शिरुर हे माहेर असलेल्या कांता शिनलकर सध्या ठाणे येथे राहत असून आबेगाव तालुक्यातील लोणी धामणी गावच्या यात्रेसाठी शिनलकर या गावी आलेल्या होत्या , शिक्रापूर येथे माहेरी थांबून २७ जानेवारी रोजी पुन्हा शिक्रापूर पुणे बस ने प्रवास करत असताना शिनलकर यांनी त्यांचे सव्वा सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने पिशवी मध्ये ठेवलेले होते , पुणे येथे गेल्यानंतर त्यांच्या पिशवीतील दागिने गायब असल्याचे निदर्शनास आल्याने कांता विलास शिनलकर ५६ रा. बदलापूर ठाणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बापू हडागळे हे करत आहे.  

धामणीतील शिवाजी विद्यालयाला बचत गटाच्या महिलांचा मदतीचा हात.

समर्थ भारत वृत्तसेवा लोणी धामणी , ता. २८:   धामणी (ता. आंबेगाव ) येथील शिवाजी विद्यालयात माता पालक संघ मेळावा तसेच तिळगुळ , हळदीकुंकू समारंभ पार पडला.या कार्यक्रमात धामणी , पहाडदरा , शिरदाळे , ज्ञानेश्वरवस्ती या जवळपास तीस बचत गटांच्या महिलांनी शिवाजी विद्यालयाला प्रत्येकी शंभर रु प्रमाणे मदत करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्षपदी विद्यालयाचे   प्राचार्य डी.आर.गायकवाड होते या वेळी विद्यार्थिनीच्या आरोग्य विषयी , हिंदू संस्कृती , तिळगुळ , हळदीकुंकू संभारंभ आदी विषयी मार्गदर्शन करण्यात आले. लोकनियुक्त सरपंच रेशमा बोऱ्हाडे यांनी धामणीतील जिजाऊ ग्राम संघातील महिला बचत गट व शिवशक्ती महिला बचत गटातील सदस्यांना प्रत्येकी शंभर रुपये याप्रमाणे विद्यालयास देणगी देण्याचे आवाहन केले सर्व महिला बचत गटातील सदस्यांनी या आवाहनास प्रतिसाद दिला.या बचत गटातर्फे जमा होणारी रक्कम लवकरच विद्यालयास सुपूर्द करण्यात येईल असे आश्वासन सरपंच बोऱ्हाडे यांनी दिले. या वेळी मुख्याध्यापक तसेच पी.एम. इमानदार , एस.आर. मनवळ , एस.एल.कोकाटे , सुमती राजगुरू यांनी विद्यालयाच्या गुणवत्तेचा चढता आलेख व...

कादंबरी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा हऴद कुंकू समारंभ उत्साहात.

समर्थ भारत वृत्तसेवा आळेफाटा ,  ता. २८:   कादंबरी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने २७ जानेवारी रोजी हळदीकुंकू समारंभ व नवीन पतसंस्थेचा काउंटर उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभाच्या दरम्यान २५०    महिला उपस्थित होत्या. तसेच २०० पुरुष उपस्थित होते. या समारंभाच्या दरम्यान संस्थेच्या अध्यक्षा सारिका दिनेश आग्रे व संस्थेच्या इतर संचालिका यांनी सर्व महिलांचे उत्साहात स्वागत केले. नवीन काउंटर उद्घाटन समारंभासाठी जिल्हा परिषद सदस्य नयना नेताजी डोके व सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत पतसंस्थेच्या नवीन काउंटरचे उद्घाटन पार पाडले. हळदीकुंकू कार्यक्रम समारंभाच्या दरम्यान लकी ड्रॉ चे आयोजन केले होते. लकी ड्रॉ कूपन साठी पाच पैठणी बक्षीस म्हणून ठेवण्यात आले होते. लकीड्रॉ ओपनचे वितरण आमदार निलेश लंके यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषद सदस्य राणी लंके यांच्या उपस्थितीमध्ये पाच पैठणी साड्या लकीड्रॉ चे वितरण करण्यात आले. तसेच उद्घाटन व हळदीकुंकू समारंभ संपन्न झाल्यानंतर सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजन आयोजित केले होते. या समारंभ दरम्यान उपस्थित मान्यव...