मंचर प्रतिनिधी:
कोरोनाच्या
वाढत्या प्रादुर्भावामुळे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर येथे
पुजाऱ्यांनी स्वयस्फूर्तीने मास्क वापरण्यास सुरवात केली आहे. दर्शनास येणाऱ्या
भाविकांनाही मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाताळ आणि
नववर्षाच्या स्वागतासाठी भाविक महाराष्ट्रारातील मोठ्या मंदिरांमध्ये गर्दी
करण्याची शक्यता आहे. मात्र कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील मंदिर
प्रशासनांनी मास्कबाबत नियमावली बनवण्यास सुरुवात केली असून, केंद्र सरकारने राज्य सरकाराना नव्या मार्गदर्शक
सूचना जारी केल्या आहेत. विमानतळावरही प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे.
या
पार्श्वभूमीवर भीमाशंकर देवस्थान येथे देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविक आणि
पर्यटकांसाठी मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परदेशातील करोना
रुग्णसंख्या वाढीनंतर देवस्थान सतर्क झालं आहे. दर्शनाला येणाऱ्या भक्तांनीही
मास्कचा वापर करावा, सोशल
डिस्टन्सिंग पाळावं आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचं आवाहन मंदिर प्रशासनाने केले
आहे.