पुणे प्रतिनिधी:
महापालिका
प्रशासन, तसेच केंद्रीय आणि राज्य प्रदूषण नियंत्रण
मंडळाने शहरात मागील दोन दिवसांत करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत, बंदी असलेल्या तब्बल 950 किलो प्लॅस्टिकच्या
पिशव्या जप्त केल्या, तसेच या
कारवाईत व्यावसायिकांकडून सुमारे 55 हजारांचा दंडही वसूल केला आहे.
पर्यावरणास
घातक असलेल्या प्लॅस्टिकवर बंदीसाठी 2018 मध्ये कायदा केला आहे. याच्या
अंमलबजावणीसाठी या तीनही विभागांकडून संयुक्त कारवाई केली जाते. त्या अंतर्गत
मंगळवारी आणि बुधवारी या संयुक्त पथकाने महात्मा फुले मंडई, मार्केटयार्ड आणि वाघोली परिसरात कारवाई केली.
यामध्ये पहिल्या दिवशी 450 किलो तर दुसऱ्या दिवशी सुमारे 500 किलो प्लॅस्टिक जप्त
केले. 9 ठिकाणी केलेल्या कारवाईत सुमारे 55 हजारांचा दंडही वसूल करण्यात आला अशी
माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांनी दिली.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे शशिकांत लोखंडे, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संदीप पाटील, महापालिकेचे आरोग्य निरीक्षक इमामुद्दीन इनामदार, राजेश रासकर, उमेश देवकर यावेळी उपस्थित होते.
पुणे शासकीय
अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीजीईपी) चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी
महापालिकेकडून या चौकात उद्वाणपूल उभारण्यात आला आहे. मात्र या पुलावर सातत्याने
वाहतूक कोंडी होत असल्याने तसेच वाहनांची वर्दळ असल्याने या वाहनांचे हॉर्न तसेच आवाजाने
महाविद्यालयातील क्लासरूम तसेच आवारात मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत आहे. हे ध्वनी
प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेकडून या पुलावर ध्वनिरोधक यंत्रणा बसविण्यात
येणार आहे. त्यासाठीच्या प्रस्तावास महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्थायी
समितीच्या बैठकीत मान्यता दिली.
हा चौक रेल्वे
स्थानक, विमानतळ, जुना राष्ट्रीय महामार्ग क्र. 4. जंगली महाराज रस्ता, गणेश सिंह रस्ता, गार्डन रस्त्यावरील प्रमुख सणाला महत्वाचा रस्ता होता मात्र त्यामुळे
या चौकात सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने महापालिकेने या ठिकाणी तीन टप्प्यात
उड्डाणपुलाचे काम सुरू केले होते. तर 2017 मध्ये हा पूल सुरू करण्यात आला. मात्र पूल
झाल्यानंतर त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागल्याने तसेच वर्दळ वाढल्याने या
वाहनांच्या आवाजाचा फटका महाविद्यालयातील क्लासरूम तसेच आवारातही बसत होता. त्यामुळे
महापालिकेने या पुलावर निरोधक लावण्याची मागणी केली होती सर्वसाधारण मानकानुसार या
भागात दिवसा 75 डेसिबल आवाज असणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र ध्वनीची पातळी
85 ते 90 डेसिबलच्या आसपास होती. मात्र, आता निरोधक लावण्यात आल्यानंतर ही पातळी 15 ते 20 डेसिबलने घटणार
असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.