कोल्हापूर प्रतिनिधी:
अनुराधा मिलिंद
पोतदार (वय ४६ वर्ष) रा. फुलेवाडी, चौधा बसस्टॉप, कोल्हापूर येथील महिला कोल्हापूर रंकाळा टॉवरजवळ जेसीबीच्या बकेटचा
धक्का लागल्याने जेसीबीच्या चाकाखाली सापडून ठार झाली आहे.सदर महिला दवाखान्यात
ड्युटीवर निघाल्या होत्या. या अपघातात पती मिलिंद पोतदार किरकोळ जखमी झाले. आज, शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला.
फुलेवाडीतील
चौथ्या बस स्टॉपजवळ राहणा-या अनुराधा पोतदार सूर्या हॉस्पिटलमध्ये रिसेप्सनिस्ट
म्हणून नोकरी करीत होत्या. शनिवारी सकाळी त्या दुचाकीवरून पतीसोबत हॉस्पिटलकडे
निघाल्या होत्या. दरम्यान, जेसीबीच्या
बकेटचा धक्का दुचाकीला लागला. यावेळी दुचाकीवरून पडून अनुराधा जेसीबीच्या डाव्या
बाजूच्या मागील चाकाखाली सापडल्या. अनुराधा यांना तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये
दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.