पुणे प्रतिनिधी:
इचलकरंजी येथून शिर्डी व औरंगाबाद येथून सागर
क्लासेसच्या सहलीला गेलेल्या विद्यार्थिनींच्या बसला माघारी परतताना बारामतीतील
पाहुणेवाडी येथे पहाटे तीन वाजता अपघात झाला. यात ३ मुली गंभीर तर २४ मुली किरकोळ
जखमी झाल्या आहेत. यात बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची
प्राथमिक माहिती समोर आली आहे.
बारामतीतील
शासकीय रुग्णालयात जखमी मुलींवर पुढील वैद्यकिय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती
स्थिर असल्याचे वैद्यकिय सूत्रांनी सांगितले.अपघातग्रस्त यशदा ट्रॅव्हलमध्ये एकूण
४८ मुली, पाच
शिक्षक प्रवास करीत होते. पहाटेच्यावेळी चालकाच्या डोळ्यावर झोप लागल्याने त्याचा
गाडीवरील ताबा सुटला असावा, अथवा
रस्त्यावरील पुल व वळणाचा अंदाज न आल्याने वरील अपघात घडला असावा,असा प्रथमदर्शनी
अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
इचलकरंजी-कोल्हापूर
येथील खासगी सागर कल्सासेसची ८ वी ते १० इयत्तेमधील मुलींची सहल यशदा ट्रॅव्हलमधून
शिर्डी येथे गेली होती.सदरची सहल संपवून आज मंगळवारी पहाटे साडेतीन ते चार
वाजल्याच्या सुमारास ही ट्रॅव्हल्स बारामतीकडून फलटण मार्गे निघाली होती.वरील
ट्रॅव्हलच्या चालकाचा पाहुणेवाडी येथील पुलावर गाडीचा ताबा सुटला. गाडी ओढ्यात
कोसळली. त्यामध्ये तीन मुली गंभीर जखमी झाल्या असून २४ मुलींना किरकोळ शारिरीक इजा
झाली आहे. सध्यातरी कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
जखमींना
उपचारासाठी बारामतीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक माहिती
माळेगाव पोलीस करीत आहेत.