पुणे प्रतिनिधी:
वाई येथील सिद्धनाथवाडी परिसरात धोम कालव्या लगत न्यास (वय १७ वर्ष) या
अल्पवयीन युवकाचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार करून खून केला आहे. ही घटना
रात्री घडली. मध्यवस्तीत झालेल्या खुनाने शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. न्यास
खरात बारावी मध्ये शिरवळ येथील एका महाविद्यालयात शिकत होता. तसेच तो पोलीस व
लष्कर भरतीसाठी वाई येथे प्रशिक्षण घेत होता.
बुधवारी दुपारपासून तो घरातून कामानिमित्त बाहेर पडला. तो घरी न
आल्यामुळे रात्रीच्या सुमारास नातेवाईकांनी पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना
माहिती दिली.त्याच्या फोनच्या लोकेशनच्या आधारे पोलिसांनी रात्रभर सिद्धनाथवाडी
परिसरातील शेती परिसरात शोध मोहीम राबविली. मात्र त्याचा शोध लागत नव्हता. आज
सकाळी त्याचा मृतदेह एका शेताच्या बांधावर आढळून आला. त्याच्या डोक्यावर आणि
शरीरावर अनेक वार करण्यात आले होते.
घटनास्थळी पोलीस
उपअधीक्षक डॉ शितल जानवे-खराडे, पोलीस निरीक्षक
बाळासाहेब भरणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे, उपनिरीक्षक स्नेहल सोमदे आणि गुन्हे प्रकटीकरण
विभागाचे सर्व कर्मचारी विजय शिर्के, किरण निंबाळकर, श्रावण राठोड सोनाली माने ,प्रसाद दुदुस्कर , उमेश गहीन, अजित जाधव आदी अनेक पोलीस कर्मचारी पोहोचले. पोलीस
तपास सुरू आहे अशी माहिती मिळताच सिद्धनाथवाडी ग्रामस्थांनी परिसरात एकच गर्दी
केली. घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. अधिक तपासासाठी सातारा येथून ठसे
तज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.