पुणे जिल्ह्यातील १७६ ग्रामपंचायतीसाठी ८१ टक्के मतदान || मुळशी तालुक्यात सर्वाधिक तर खेड तालुक्यात सर्वात कमी मतदान
समर्थ भारत वृत्तसेवा
पुणे, ता. १८: जिल्ह्यातील १७६ ग्रामपंचायतीसाठी रविवारी शांतेतमध्ये मतदान झाले. सरपंच आणि सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी ६५१ मतदान केंद्रांवर रविवारी सरासरी ८१ टक्के मतदान झाले. निवडणुकीसाठी १ हजार २२९ उमेदवार रिंगणात असून निवडणुकीसाठीची मतमोजणी मंगळवारी (२० डिसेंबर) होणार आहे.
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदान मुळशीमध्ये झाले असून ८५.८२ टक्के मतदान झाले. भोरमध्ये ८५.०५ टक्के, बारामतीमध्ये ८४.९३टक्के तर दौंड ८३.९४ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. एकूण मतदारांपैकी १ लाख १८ हजार २४४ महिलांनी तर १ लाख २६ हजार ९२१ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
पुणे जिल्ह्यातील १२ तालुक्यातील १७६ ग्रामपंचायतींसाठी एकूण ३ लाख ३ हजार ५८९ मतदार आहेत. त्यापैकी रविवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत २ लाख ४५ हजार १६६मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.मतदानासाठी मतदान केंद्रांवर सकाळपासून गर्दी झाली होती. सकाळी साडे सात वाजता मतदानास सुरुवात झाली. सायंकाळी साडेपाच वाजता मतदानाची प्रक्रिया संपली. दुपारी साडेतीन पर्यंत ७१ टक्के मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर शेवटच्या दोन तासात दहा टक्के मतदान झाले, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत शाखेकडून सांगण्यात आले.
पुणे जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील मतदान
आंबेगाव तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीसांठी ७५.८९ %
बारामती तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीसाठी ८४.९३ %
भोर तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींसाठी ८५.०८ %
दौंड तालुक्यातील आठ ग्रापंचायतीसाठी ८३.९४ %
हवेली तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींसाठी ७५.५६ %
इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीसांठी ८३.७१ %
जुन्नर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींसाठी ८३.५२ %
खेडमधील २१ ग्रामपंचायतींसाठी ७२.११ %
मावळ मधील ८ ग्रामपंचायतींसाठी ८९.६१ %
मुळशीतील ५ ग्रामपंचायतींसाठी ८५.८२ %
शिरूरमधील ४ ग्रामपंचायतींसाठी ८४.०६ %
वेल्हे तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीसाठी ८४.९० %