समर्थ भारत वृत्तसेवा
भोर, ता. १५: भोर तालुक्यातील निगडे धांगवडी येथे गुंजवणी नीरा नदीपात्रातील पाण्यात मोटार ढकलत असताना अचानक गेलेली वीज परत आल्याने आणि पाण्यात वीजप्रवाह उतरल्यामुळे एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये बापलेकांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच वीज मंडळ व पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत.
विठ्ठल सुदाम मालुसरे, सनी विठ्ठल मालुसरे, अमोल चंद्रकांत मालुसरे, आनंदा ज्ञानोबा जाधव (सर्व रा. निगडे ता.भोर जि. पुणे) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. गुंजवणी नीरा नदीपात्रातील पाण्यात मोटार ढकलत असताना अचानक गेलेली वीज परत आल्याने आणि पाण्यात वीजप्रवाह उतरल्यामुळे चौघांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये बापलेकांचा समावेश आहे.
महावितरणाचा भोंगळ कारभारामुळे निष्पाप चार शेतकऱ्यांचा जीव गेला आहे. ही घटना घडण्याच्या आधी सतत सहा वेळा लाईट गेली होती. विठ्ठल सुदाम मालुसरे, सनी विठ्ठल मालुसरे, अमोल चंद्रकांत मालुसरे, आनंदा ज्ञानोबा जाधव (सर्व रा. निगडे ता.भोर जि. पुणे) हे चौघे गुंजवणी नीरा नदीपात्रातील पाण्यात मोटार ढकलत असताना अचानक लाइट आल्याने त्यांना विजेचा धक्का लागून त्यांच्या जागीच मृत्यू झाला. या चौघांचे मृतदेह मिळाले असून घटनास्थळी महसूल, महावितरण राजगड पोलिस आरोग्य विभाग दाखल झाले आहे. घटनास्थळी व गावांमध्ये आक्रोश सुरू आहे.याबाबत भोर पोलीस पुढील तपास करत आहे.