प्रतिनिधी:पोखरी
पोखरी (ता. आंबेगाव) येथील श्री पंढरीनाथ महाविद्यालयात महाराष्ट्र शासन कृषी विभाग व सह्याद्री आदिवासी ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्या वतीने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान आणि राष्ट्रीय विकास योजनेंतंर्गंत ठिबक व तुषार संच बसविण्यासाठी मोफत ऑनलाईन नोंदणी मोहिम राबविण्यात आली. यावेळी कृषी विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना महाडीबीटी योजनेंअंतर्गत विविध योजनांची सखोल माहिती देण्यात आली.
सह्याद्री पर्वतंरागांमधील अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी शेतक-यांच्या उत्पन्न वाढीसाठी व रोजगारनिर्मिती मदत मिळावी म्हणून सह्याद्री आदिवासी ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीकडून प्रायोगिक तत्त्वावर स्ट्रॉबेरीचे पिक घेण्यासाठी यावर्षी पोखरी, निगडाळे परिसरातील शेतक-यांना तीन हजार रोपांचे वाटप करण्यात आले. तर कृषी विभागाने हरबरा व मसूर बियाणे किटचे वाटप केले.
यावेळी पोखरीचे सरपंच हनुमंत बेंढारी, उपसरंपच आदिनाथ बेंढारी, सह्याद्री आदिवासी ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष रवींद्र तळपे, संचालक सीताराम जोशी, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय आढारी, श्री पंढरीनाथ महाविद्यालयाचे अध्यक्ष बाळासाहेब कोळप, प्राचार्य प्रा. डॉ. शशिकांत साळवे, गोहे बुचे उपसरंपच सोमनाथ गेंगजे, लक्ष्मण पावरा, डिंभे येथील मंडळ कृषी अधिकारी एन.आर.पवार, धोंडिभाऊ पाबळे, अरविंद मोहरे, ज्ञानेश्वर लोहोकरे, कृषी सहाय्यक, शिक्षक व शेतकरी उपस्थित होते.