प्रतिनिधी :कवठे येमाई
कवठे येमाई 18 नोव्हेंबर- शिरूर तालुक्यातील शिरुर-मंचर रोडवर एम.आर.एफ टायर शोरुमच्या पुढील बाजुस नागेश दत्तात्रय महामुनी यांनी आपल्या जागेत नवीन बांधकाम चालु केले होते,थोडे बांधकाम झाल्यावर त्या भिंतीवर अज्ञात व्यक्तींनी गुलाल,लिंबु,टाचण्या,बाहुली,नारळ असे साहित्य वाहुन जादुटोण्यासारखा अघोरी प्रकार केला आहे.
नागेश महामुनी यांनी नविन हाॅटेल करीता काम चालु केले होते,बांधकामाच्या भींती दोन फुट वरती आल्या आहेत, त्यातच असा प्रकार झाल्याने ते भयभीत झाले आहे.
महामुनी यांनी आमच्या कुटुंबावर मागेही असे प्रकार करण्याचे प्रयत्न केले गेले आहेत,हा अघोरी जादुटोण्याचाच प्रकार आहे असे सांगितले.त्यामुळे ह्या प्रकारचा लवकर छडा लावण्यात यावा अशी त्यांनी मागणी केली.
सा.कार्यकर्ते किरण देशमुख व मलठण ग्रामस्थ यांनीही असा अघोरी प्रकार निंदणीय असुन असे कृत्य करणार्याला कडक शासन व्हावे अशी मागणी केली.
एका अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्याशी ह्या प्रकाराबाबत विचारले असता हा प्रकार केवळ घाबरविण्याचा असावा असे सांगितले. जादूटोणा,मुठ,भानामती,करणी,असा कोणताही प्रकार नसतो.