प्रतिनिधी: वांद्रे
खेड तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. थंडीचा सामना करण्यासाठी आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना मायेची ऊब मिळाली. शालेय साहित्य , गणवेश व नव्या स्वेटर मुळे चेहऱ्यावर आनंद पसरला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोरणे, वांद्रे, पढरवाडी व तांबेवाडी येथे पंडित जवाहरलाल नेहरू, बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन गटशिक्षणाधिकारी जीवन कोकणे ,विस्ताराधिकारी रामाणे साहेब, शिक्षण विस्ताराधिकारी गोडसे साहेब तांबेवाडी गावच्या सरपंच जयश्री सावंत, उपसरपंच कैलास निधन यांच्या हस्ते पुष्पहार अपर्ण करून अभिवादन करण्यात आले.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान वाघोली या संस्थेच्या वतीने शालेय साहित्य, गणवेश व स्वेटर वाटप करण्यात आले. त्यावेळी उपस्थित शिक्षणाधिकारी कोकणे, विस्तार अधिकारी रामाने, गोडसे,तांबेवाडी गावच्या सरपंच जयश्री सावंत, उपसरपंच कैलास निधन,या.संरपच नथु निधन, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पांडुरंग निधन, राणाजी निधन, संदीप निधन, धुंदा आंबे, अशोक निधन,केंद्रप्रमुख भांबळे, मुख्याध्यापक साबळे सर, राऊत सर व या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.