राजगुरुनगर प्रतिनिधी :
राजगुरुनगर : पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य सहकारी बँक समजल्या जाणाऱ्या राजगुरुनगर बँकेच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक हरिश्चंद्र कांबळे यांनी दिली.
या निवडणुकीसाठी रविवारी (दि.६ नोव्हेंबर) सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे.बँकेच्या १७ शाखांसाठी १५ ठिकाणी २९ हजार २१९ सभासद मतदारांना एकूण ६४ मतदान केंद्रांवर मतदान होईल यासाठी सुमारे ४०० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
सर्वसाधारण गटात किरण आहेर, समीर आहेर,दिनेश ओसवाल,निलेश आंधळे,विष्णू कड,संतोष काचोळे, अंकुश कोहिनकर,डॉ.सी ए किसन गारगोटे,बाळासाहेब गारगोटे, विनायक घुमटकर,अरुण थिगळे, गणेश थिगळे,राहुल तांबे,विश्वास नेहरे,सतीश नाईकरे,सागर पाटोळे,दत्तात्रय भेगडे,राजेंद्र वाळुंज , किरण मांजरे,राजेंद्र सांडभोर,माणिक सातकर,कालिदास सातकर,सुभाष होले,असे एकुण २३ उमेदवार रिंगणात आहेत.
महिला उमेदवार दोन जागांसाठी विजया शिंदे,अश्विनी पाचारणे,हेमलता टाकळकर,यांच्यात लढत आहे.
विशेष मागास प्रवर्ग एका जागेसाठी डि.के गोरे व रामदास धनवटे यांच्यात लढत होत आहे.