आंबेगाव तालुक्यातील अवसरी येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात एका विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला झाला असून हल्लेखोर हा देखील याच महाविद्यालयातील विद्यार्थी आहे. जखमी राहुलवर मंचर येथील विनायक हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. राहुल गौतम आवारी असं हल्ला झालेला विद्यार्थी असून तो खेड तालुक्यातील देवतोरणे या गावचा रहिवासी असून हल्लेखोर हा आंबेगाव तालुक्यातील भोरवाडी गावचा रहिवासी असून त्याने तीक्ष्ण हत्याराने राहुलवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात राहुल थोडक्यात बचावला असला तरी त्याला तब्बल 15 टाके पडले असल्याचे डॉक्टर विनायक खेडकर यांनी सांगितले. हल्लेखोर प्रतीक भोर हा गुंड प्रवृत्तीचा विद्यार्थी असल्याचे इतर विद्यार्थ्यांनी सांगितले. या महाविद्यालयात वारंवार अशा घटना घडत असल्याने, या घटनांना आळा बसण्यासाठी राहुल आवारीच्या कुटुंबीयांनी गुन्हेगाराला कडक शासन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दरम्यान मंचर पोलिसांनी देखील घटनास्थळी तसेच रुग्णलयात धाव घेतली असून पोलीस हवालदार हिले, पोलीस कॉन्स्टेबल अजित पवार यांनी विद्यार्थ्याचा जबाब नोंदविला आहे. व्हिडीओ
समर्थ भारत माध्यम समूह