लांडेवाडी येथे भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजीराव आढळराव पाटील प्रेक्षागृहाचा उद्घाटन समारंभ पार पडला.
मंचर प्रतिनिधी:
लांडेवाडी येथे भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजीराव आढळराव
पाटील प्रेक्षागृहाचा उद्घाटन समारंभ पार पडला.हा सोहळा सिनेअभिनेते प्रशांत
दामले, प्रवीण तरडे, रवी काळे यांसह जुन्नरचे माजी आमदार जिल्हाप्रमुख शरद सोनवणे
फॉक्स वॅगनचे जनरल मॅनेजर जयेश सुळे, खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी
सुदर्शन पाटील, शिरूर हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी आंबेगाव
जुन्नरचे उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर,डायनालॉग इंडियाचे कार्यकारी संचालक अक्षय
आढळराव पाटील, खेड भाजप नेते अतुल देशमुख, कल्पना आढळराव पाटील, अपूर्व आढळराव
पाटील, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, भाजप जिल्हा किसान मोर्चाचे
अध्यक्ष संजय थोरात, संपर्क नेते जयसिंग एरंडे आदी मान्यवरांच्या हस्ते झाला.
लांडेवाडी येथे श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने
उभारण्यात आलेले प्रेक्षागृह हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव
देण्यासाठी निश्चितच महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल असे मत यावेळी माजी खासदार
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले.
दरम्यान यावेळी एका लग्नाची पुढची गोष्ट या अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री कविता मेढेकर आणि अतुल तोडणकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या बहारदार कौटुंबिक नाटकाने कलारसिकांचे मनोरंजन केले.याप्रसंगी सामाजिक-राजकीय व विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू आढळराव पाटील यांनी केले.