प्रतिनिधी :पारगाव शिंगवे
नागापूर गावच्या हद्दीत असलेल्या थापलींग येथील पायथ्यालगत असलेल्या बंधाऱ्यायावरील ४१ ढाप्यांची चोरी झाली आहे. याबाबत पारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस स.निरीक्षक लहू थाटे,पोलीस उपनिरीक्षक लोहकरे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक नितीन वाव्हळ, नागपूरचे सरपंच सुनील शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे.
नितीन वाव्हळ हे शेतकरी शेतीकडे पाणी सोडण्यासाठी जात असताना सकाळी बंधाऱ्यावरील ४१ ढापे चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.याबाबत त्यांनी सरपंच शिंदे यांना माहिती दिली. या अगोदरही बंधाऱ्यावरील १० ढापे चोरीला गेले होते.