प्रतिनिधी:समीर गोरडे
मंडळ अधिकारी कार्यालय पारगाव तर्फे अवसरी बु. याठिकाणी महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या महाराजस्व अभियान अंतर्गत फेरफार अदालत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आंबेगाव तालुका तहसील रमा जोशी ह्या देखील उपस्थित राहून फेरफार अदालत कार्यक्रमात फेरफार दुरूस्ती करून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावताना दिसत होत्या. ह्यावेळी शेतकऱ्यांना पिक पाहणीसाठी त्यांनी आव्हान देखील केले. मंडळ अधिकारी विश्वास शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांचे निराकरण करून प्रश्न मार्गी लावले तसेच मंडळ अधिकारी कार्यालय अंतर्गत येणारे पारगाव तलाठी व्ही व्ही खोटे, निरगुडसर तलाठी व्ही एम मुगदळे तसेच शेतकरीही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.