प्रतिनिधी:विलास भोर
जांबुत ता. शिरूर येथील जोरी मळ्यातील १९
वर्षीय पुजा भगवान नरवडे या युवतीवर ती घराबाहेर लघुशंकेसाठी गेली असता, ऊसात दबा
धरून बसलेल्या बिबट्याने तिला हल्ला करून ठार केले आहे.
ही युवती कला शाखेच्या दुसऱ्या वर्गात शिकत
होती. जांबुत गावात यापुर्वी बिबट्याने एका बालकाचा व दोन महीन्यापुर्वी एका
युवकावर हल्ला करुन ठार केले होते. पुन्हा याच गावात १९ वर्षीय युवतीवर हल्ला करून
ठार केलेली ही तिसरी घटना असून जांबुत परीसरासह बेट या भागातील नागरीक प्रंचड
भयभीत झाले असून वन विभागाच्या कारभारावर संतप्त झाले आहे. तसेच आमदाबाद येथे
सोनवणे यांच्या शेळीवर हल्ला करून ठार केले आहे.
बिबट्याने बेट भागात उच्छाद मांडला असून बिबट्याच्या हल्ल्यात या तीन जणांचा नाहक बळी गेला असून वडनेर, पिंपरखेड येथील नागरीक गंभीर जखमी केले आहे. शिरूर तालुक्यात बिबटयांची संख्या मोठया प्रमाणावर वाढल्यामुळे दिवसाढवळ्या शेतकऱ्यांना बिबटयाचे दर्शन होत आहे. पशूधनाबरोबरच नागरीकांवर हल्ले होत असल्याने तीव्र प्रतिसाद उमटले आहे. या भागात बिबट्या नरभक्षक बनला असून अजून किती मृत्यू होण्याचे वनखाते वाट पाहत आहे. नरभक्षक बनलेल्या बिबट्याचे तातडीने वनखात्याने बंदोबस्त करावा अशी मागणी बेट भागातून होत आहे.