प्रतिनिधी:विलास भोर
एका गुन्ह्याच्या तपासासाठी जुन्नर पोलिसांनी जुन्नर तालुक्यातील अक्षय मोहन बोऱ्हाडे यांना ताब्यात घेतले असताना, बोऱ्हाडे यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय.
जुन्नरचे परदेशी यांनी
दिलेल्या तक्रारीवरून जुन्नर पोलिसांनी अक्षय बोऱ्हाडेंवर गुन्हा दाखल केला होता.
संबंधित गुन्ह्यात अक्षय बोऱ्हाडे फरार होते, नुकतंच
पोलिसांनी अक्षय बोऱ्हाडेंना ताब्यात घेतलं होतं. पोलिसांच्या ताब्यात असतानाच
अक्षय बोऱ्हाडे यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
सदर घटनेनंतर
अक्षय बोऱ्हाडे यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांची प्राथमिक
तपासणी करून पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्याचा सूचना केल्या आहेत.