प्रतिनिधी: प्रमिला टेमगिरे, थोरांदळे
शिवशंकर सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित थोरांदळे यांच्या कडून दूध उत्पादक शेतकरी गवळी बांधवांना दिवाळी निमित्त बोनस व फराळ वाटप .
शिवशंकर दूध उत्पादक संस्था ही गेली १२ वर्षापासून गवळी बांधवांना दिवाळी निमित्त बोनस व फराळ वाटपाचा उपक्रम राबवत आहे .शिवशंकर दूध उत्पादक संस्थेत दूध घालणारा गवळी त्याचे एक लिटर दूध असो वां उच्चांकी दूध असो .या संस्थेने सगळ्यांना समान पद्धतीने दिवाळी फराळ वाटप करून गवळी बांधवांना त्यांच्या दुधाच्या अनुक्रमे बोनस वितरण करून सभासद व गवळी बांधवांची दिवाळी आनंदाची केली .त्यासोबत शिवशकर दूध उत्पादक संस्थेने ज्या गवळी लोकांचे सर्वात जास्त दूध संकलन आहे त्यांना ब्ल्यांकेट पण वितरीत केले असून सरासरी सर्व शेअर्स सभासदांना उत्तम कॉलटीचे फायबर टब दिवाळी भेट म्हणून देऊन सन्मानित केले . या कार्यक्रमाचे आयोजन करताना त्यांनी नियोजित केल्याप्रमाणे ही दिवाळी भेट त्यांनी महिला गवळी म्हणून त्यांना कार्यक्रमात बोलावून त्यांना बोनस व दिवाळी भेट प्रत्येकी महिलेला भाऊबीज भेट म्हणून ब्लाउस पिस पण भेट देण्यात आले .शिवशंकर सहकारी दूध उत्पादक संस्था नेहमीच सामाजिक ,धार्मिक,शालेय शिक्षणाच्या बाबतीत हिरारीने अग्रेसर असते त्यांचा खूप मोठा मोलाचं योगदान असते . कोरोना काळात देखील या संस्थेने कोरोणा योध्याना सन्मान पत्रक देऊन त्यांना सन्मानित केलं.
महत्वाचा भाग म्हणजे या संस्थेचे आर्थिक व्यवहार व गवळी बांधवांना वेळोवेळी अडचणीच्या प्रसंगी तत्काळ मदत असल्यामुळे ही संस्था आज आंबेगाव तालुक्यात नावाजलेली संस्था आहे संस्थेचा कारभार खूप पारदर्शक असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी साध्य करता येतात असे गवळी बांधवांचे व गवळी महिलांचे म्हणणे आहे
सदर बोनस वितरण कार्यक्रमासाठी भीमाशंकर सहकारी कारखान्याचे संचालक मा . दादाभाऊ शेठ पोखरकर , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय देवदत्त निकम साहेब , पुणे जील्हा कात्रज दूध संघ संचालक विष्णू काका हिंगे. लोकनियुक्त सरपंच जे डी साहेब , व ग्रामपंचायत सर्व अजी माझी सदस्य विविध कार्यकारी संस्थांचे पदाधिकारी अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका महिला अध्यक्ष सुष्माताई शिंदे ,महिला फेडरेशन अध्यक्ष निलम टेमगीरे, पोलीस पाटील वैशालीताई अश्या अनेक मान्यवरांचे हस्ते बोनस व दिवाळी फराळ वाटप करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवशंकर सहकारी दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन बाळासाहेब टेमगिरे यांनी केले , सूत्रसंचालन माजी सोसायटी चेअरमन बाळासाहेब टेमागिरे यांनी केले . आणि डॉ विश्वासराव यांनी आभार व्यक्त केले.