मंचर प्रतिनिधी:
अवसरी ता. आंबेगाव येथे आम आदमी पार्टीचा मेळावा उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी आम आदमी पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांच्या हस्ते आंबेगाव तालुका आम आदमी पार्टी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, त्यांनी संघटक, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अरविंद केजरीवालांच्या मेक इंडिया नं. 1 कॅपेनची माहिती दिली व भडकलेल्या महागाईत दुध दही यावरसुद्धा टैक्स भरणारया जनतेला शिक्षण आरोग्य, वीज ,पाणी, रस्ते या मुलभुत सुविधा मोफत का मिळाव्यात याविषयी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, तसेच आम आदमी पार्टी महाराष्ट्रातील तालुका पातळीवरील सर्व निवडणूका लढवणार असल्याचे जाहिर केले.
याप्रसंगी जिल्हा सचिव,अक्षय शिंदे, तालुका समन्वयक वैभव टेमकर, जुन्नर तालुका समन्वयक संजय चव्हाण समन्वयक, अनिल भोर, गणेश टाव्हरे, सयाजी शेवाळे, मंचर शहर अध्यक्ष सालिम इनामदार, नामदेव खिलारी, सुनिल खिलारी, राजेश जाधव, रहेमान इनामदार, अंकुश राठोड, अतुल शेंडे या आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील कार्यकर्त्यांसोबत खेड चाकण येथील संघटकदेखील उपस्थीत होते.
याप्रसंगी वैभव टेमकर आंबेगाव तालुका यांनी आभार व्यक्त केले व यापुढे संघटक, कार्यकर्ते पक्षकार्य जोमाने वाढवून देशात आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन करण्यात मोलाचा वाटा उचलतील हा विश्वास व्यक्त केला.