मंचर प्रतिनिधी:
दि. २७ सप्टेंबरला गिरवली येथे अपघात झालेल्या पिंपळगाव घोडा गावचे शाळकरी मुलांची व पालकांची पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साईनाथ हॉस्पिटल भोसरी येथे भेट घेतली होती तसेच आस्थेने विचारपूस करून चौकशी केली होती . हॉस्पिटलसाठी लागणाऱ्या खर्चाची जबाबदारी सरकार घेईल असे सर्व नातेवाईकांना दादांना अश्वस्थ केले होते. त्याप्रमाणे आज त्यामधील चार रुग्णांना ज्योती लडके, नम्रता लडके, गीतांजली शर्मा व लिलाधर लांडगे याना रुग्णालयातून उपचार करुन सोडण्यात आले. त्यांचे सर्व हॉस्पिटल बिल सांगितल्या प्रमाणे चंद्रकांत पाटिल यांच्या माध्यमातून भरण्यात आले. हॉस्पिटल बिलाची पुर्तता करण्यासाठी चंद्रकांत पाटिल यांच्याकडुन नामदेव ढाके आले होते. त्यावेळी महेश दादा फाउन्डेशनचे अध्यक्ष कुंदन काळे उपस्थित होते. सर्व नातेवाईकांनी तसेच संस्थेच्या पदाधिकारी शिक्षक कर्मचारी वृंद यानी चंद्रकांत पाटिल यांचे आभार व्यक्त केले .
या सर्वांचा पाठपुरावा बाळा भेगडे, जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे यांनी केला.त्यांचे ही
नातेवाईक व आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले.
साईनाथ हॉस्पिटलचे डॉ सुहास कांबळे यानी उत्तम दर्जाची वैद्यकिय सेवा माफक दरात केली . डॉ सुहास कांबळे यांचे ही चंद्रकांत पाटिल , जयसिंग एरंडे, विजय पवार, डॉ.ताराचंद कराळे, संदीप बाणखेले, राजेश काळे तसेच रुग्णाच्या नातेवाईकानी आभार व्यक्त केले .