खेड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा.. खालुंब्रे येथील शुभम शिंदे यांना राज्यस्तरीय युवा कला गौरव पुरस्कार झाला जाहीर
खेड प्रतिनिधी:
राज्यस्तरीय युवा कला गौरव पुरस्कार खालुंब्रे येथील शुभम शिंदे यांना जाहीर झाला असून , संगीत व कला विभाग आर्ट बिट्स फाऊंडेशनकडून हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.एक प्रतिभावान कलाकार व युवा पखवाज वादक म्हणून केलेल्या उलेखनिय कार्याची दखल घेऊन यंदाचा हा पुरस्कार खेड तालुक्यातील खालुंब्रे गावचे शुभम शिंदे यांना जाहीर झाला आहे.याबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
या पुरस्काराची माहिती देताना आर्ट बिट्स पुणे या संस्थेचे संस्थापक संचालक संतोष पांचाळ म्हणाले की ,आर्ट बिट्स ही संस्था गेली एकवीस वर्ष सातत्याने नामांकित कलाकारांना हे पुरस्कार त्यांच्या वैयक्तिक पातळीवर कामाची पाहणी करूंन जाहीर करण्यात येतात.यावर्षी संगीत कला या विभागात हा पुरस्कार खालुंब्रे गावचे शुभम शिंदे यांना जाहीर झाला आहे शुभम शिंदे हे एक प्रतिभावंत युवा कलाकार आहेत. समाधान महाराज सुरवडकर, अशोक महाराजजी पांचाळ यांचे ते शिष्य आहेत तर काही वर्ष ते जगविख्यात पखवाज वादक सुखद मुंढे ,अनुजा ताई बोर्डे यांच्या कडे त्यांनी शिक्षण घेतले आहे.शुभम शिंदे यांनी सुप्रसिध्द अशा अनेक शास्त्रीय संगीत महोत्सवामध्ये अनेक दिग्गज कलाकारांसोबत साथसंगत केली आहे.एकल वादन इतर वाद्यासह संगीत, धृपद , गायन , वारकरी भजन ,क्लासिकल भजन असे त्यांनी अनेक कार्यक्रम केले आहेत.शुभम शिंदे यांना उत्कृष्ट पखवाज वादक हा देखील पुरस्कार मिळाला आहे
शुभम शिंदे हे खालुंब्रे येलवाडी गावांचे ग्रामदैवत असलेल्या जोपादेवी मातेचे पुजारी आहेत. शुभम शिंदे हे गेल्या १२ वर्षांपासून पखवाज शिक्षण घेत आहेत. शुभम शिंदे यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला असून ते आपल्या पखवाज वादनाच्या कार्यक्रमातून आपल्या कुटुंबास मदत करत असतात. शुभम शिंदे यांच्या गुरुकृपा म्युझिक क्लासमधून अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.गरीब विद्यार्थी शिकला पाहिजे व सर्वांनाच पखवाज शिकता यावा म्हणून त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य पखवाज शिक्षण चालू केले आहे त्यामुळे असंख्य विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पखवाज वादकांची संख्या जास्तीत जास्त वाढावी व उत्कृष्ट पखवाज वादक माझ्या गावातील व परिसरातील वारकरी भजनाला मिळावा आणि पखवाज ह्या पारंपरिक वाद्याचा विकास करण्यात छोटासा हातभार असावा म्हणून त्यांचा एक प्रयत्न आहे.शुभम शिंदे म्हणतात की हा पुरस्कार जांच्या कष्टाने आशीर्वादाने इथपर्यंत मी पोहोचू शकलो अशा माझ्या वडिलांना, माझ्या गावातील सर्व जेष्ठ नागरिकांना , वडीलधाऱ्या व्यक्तींना व जोपादेवी भजनी मंडळ खालुंब्रे यांना समर्पित करतो.